शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"पुलाचे उद्घाटन झाले आता 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' असे नामकरण कधी?"; भाजपाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 14:48 IST

Mumbai News : 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' असे नामकरण करण्यासाठी स्थानिक खासदार मनोज कोटक यांनी ९ डिसेंबर २०२० ला प्रस्ताव दिला होता, आणि आठ महिन्यानंतर अद्यापही हा प्रस्ताव महापालिकेतच प्रलंबित आहे.

मुंबई - एम पूर्व विभागातील वीर जिजामाता मार्गावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सदर पुलाचे 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' असे नामकरण करण्यासाठी स्थानिक खासदार मनोज कोटक यांनी ९ डिसेंबर २०२० ला प्रस्ताव दिला होता, आणि आठ महिन्यानंतर अद्यापही हा प्रस्ताव महापालिकेतच प्रलंबित आहे.

मोठा गाजावाजा करत सत्ताधारी शिवसेनेने काल पुलाचे उदघाटन केले. मात्र या पूलावर बसवण्यात आलेल्या नामकरण कोनशिलेवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव आहे; परंतू छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवसेना सत्ताधारी उड्डाणपुलास देऊ शकली नाही ही बाब निश्चितच समस्त महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी आहे. या उड्डाणपुलाचे उदघाटन झाले मात्र नामकरण कधी? असा सवाल भाजपा खासदार मनोज कोटक यांनी केला आहे.

सहा किलोमीटर लांब घाटकोपर मानखुर्द जोडमार्गाचे नामकरण 'वीर जिजामाता भोसले मार्ग'  असे महापालिकेच्या ठरावाद्वारे करण्यात आले आहे. परंतू या संपूर्ण सहा किलोमीटरच्या रस्त्यावर एकाही ठिकाणी 'वीर जिजामाता भोसले मार्ग' असा नामफलक लावलेला नाही हे ही दुर्दैव आहे अशी खंत भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केली.

महापालिकेतील शिवसेनेच्या नेत्यांना किमान छत्रपती शिवाजी महाराज, वीर जिजामाता भोसले यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांच्या नामकरणाबाबत तसेच त्यांच्या नामफलकाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सुबुद्धी  देवो अशी भावना भाजपा नगरसेवक  भालचंद्र शिरसाट यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMumbaiमुंबईShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज