शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या थापा! इंदापूर तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता; दत्तात्रय भरणेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 19:21 IST

NCP Gram panchayat Indapur: विरोधकांच्या थापाकडे नागरिकांनी लक्ष देऊ नये : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना भरीव विकास निधी देणार

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील साठ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडी नुकत्याच पार पडल्या, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या ४० ग्रामपंचायती व २ संमिश्र वर्चस्व निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अखंड सुरू असलेल्या विकास कामावर तालुक्यातील तमाम जनतेचा विश्वास असल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसमय इंदापूर तालुका झाला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

   सर्वसामान्य जनतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचारसरणीतून इंदापूर तालुक्यामध्ये कामकाज सुरू आहे.  सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून झोपडीतील माणसाचा विकास व न्याय देण्याची भूमिका सातत्याने असल्यामुळे, प्रत्येक गावापर्यंत शासनाच्या विविध योजनेचा निधी पोहोचलेला असून विकास पोचला आहे. इंदापूर तालुक्यातील विरोधक हे जनतेची दिशाभूल करण्यासाठी, इतक्या ग्रामपंचायती आमच्या विचाराच्या आल्या. आशा चुकीच्या बातम्या पसरवू लागले आहेत. परंतु ज्या साठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, यामध्ये तब्बल ४० ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व झाले आहे. तर दोन ग्रामपंचायती संमिश्र आले आहेत. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती च्या विकासासाठी मी कटिबद्ध असून गावातील रस्ते पिण्याचे पाणी वीज या मूलभूत सुविधा प्रत्येक गावाला दिल्या जातील. त्यामुळे तालुक्यातील कोणताही नागरिक, विरोधकांच्या भूल थापांना कधीही फसत नाही. असाही विश्वास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला आहे.

      राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचे सातत्याने लक्ष इंदापूर तालुक्यावर, असल्यामुळे तालुका पुणे जिल्ह्यामध्ये विकास कामात पुढे राहिला आहे. दळणवळणासाठी महत्त्वाचे समजले जाणारे रस्ते अद्यावत होत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांचा उपेक्षित असलेल्या पाणीप्रश्न मार्गी लागत आहे. पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून मिळणारे पाणी जास्तीचे मिळणार आहे, हा चाललेला विकासाचा महापुर विरोधकांना देखवत नाही. अशी टीका राज्यमंत्री भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली.

    मी कधीही खोटे बोलत नाही.जे बोलायचे ते विकास कामातून बोलून दाखवतो. मात्र विरोधकांना काहीच हातात काम नसल्यामुळे, खोटे बोलून दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.हा प्रयत्न अक्षरश: नुकत्याच झालेल्या इंदापूर तालुक्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये, नागरिकांनी नाकारला आहे अशीही टिका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाgram panchayatग्राम पंचायत