शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला, अशोक चव्हाणांचा पलटवार

By मोरेश्वर येरम | Updated: December 3, 2020 17:23 IST

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपकडून निवडणुकीला उभं राहिलेल्या अमरिश पटेल यांचा धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय झाला आहे.

मुंबईधुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर भाजपकडून जोरदार टीका केली गेली. भाजपच्या टीकेला काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला आहे", असा घणाघात चव्हाण यांनी केला आहे. 

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपकडून निवडणुकीला उभं राहिलेल्या अमरिश पटेल यांचा धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय झाला आहे. अमरिश पटेल काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने महाविकास आघाडीला मोठं नुकसान झालं आहे. त्यावरही अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"भाजपने मिळवलेला विजय हा दुसऱ्याच्या घरात चोरी करुन मिळवलेला विजय आहे. दुसऱ्याच्या घरात चोरी करायी आणि त्याला आपली संपत्ती म्हणायचं अशातला हा प्रकार आहे. आम्हाला पाच जागा मिळतील आणि आमचं आघाडीचं सरकार देखील पाच वर्ष टिकेल", असं अशोक चव्हाण म्हणाले. 

धुळे-नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीकडे २१३ सदस्यांची ताकद होती. तर भाजपकडे १९९ सदस्य होते. असं असतानाही अमरिश पटेल यांनी महाविकास आघाडीची मतं फोडण्यात यश मिळवलं. महाविकास आघाडीचे उमेदवार यांना केवळ ९८ मतं मिळाली. तर भाजपच्या अमरिश पटेल यांना तब्बल ३३२ मतं मिळाली. त्यामुळे अमरिश पटेल यांनी २३४ मतांनी दणदणीत विजय प्राप्त केला. अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील हा सलग तिसरा विजय आहे. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणDhuleधुळेAmrishbhai Patelअमरीशभाई पटेलcongressकाँग्रेस