शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

अबब! चंद्रकांत पाटलांनी सांगितला भलामोठा आकडा; २०२४ च्या निवडणुकीत लक्ष्य साध्य करणार?

By प्रविण मरगळे | Updated: February 12, 2021 11:53 IST

BJP Chandrakant Patil News: २०१४ च्या निवडणुकीत जवळपास १७ कोटी मतदान घेऊन देशात भाजपाचं सरकार आलं, त्या निवडणुकीत भाजपाला २८२ जागा मिळाल्या

ठळक मुद्दे२०१९ च्या निवडणुकीत भाजपाला २२ कोटी मतदान झालं, या निवडणुकीत ३०३ जागा पटकावल्या.देशात सरकार बनवण्यासाठी २७२ जागांचे बहुमत असताना ४०० जागा का असा प्रश्न पडू  शकतोलोकांची मदत करत असताना जास्तीत जास्त मतं भाजपाच्या कमळ चिन्हासोबत कशी जोडता येतील यासाठी प्रयत्नशील राहावं

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये होणार असल्या तरी या निवडणुकांसाठी भाजपाने आतापासून प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना येत्या २०२४ च्या निवडणुकीत तब्बल ३० कोटी मतं आणि ४०० पेक्षा अधिक जागा देशभरात जिंकायच्या आहेत असा दावा केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत जवळपास १७ कोटी मतदान घेऊन देशात भाजपाचं सरकार आलं, त्या निवडणुकीत भाजपाला २८२ जागा मिळाल्या. तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला २२ कोटी मतदान झालं, या निवडणुकीत ३०३ जागा भाजपानं पटकावल्या. त्यामुळे आता पुढील २०२४ निवडणुकीत भाजपाला देशात ३० कोटी मतं आणि ४०० पेक्षा अधिक जागा जिंकायच्या आहेत असं विधान त्यांनी केले.(BJP Chandrakant Patil Statements on 2024 Lok Sabha Election) 

त्याचसोबत देशात सरकार बनवण्यासाठी २७२ जागांचे बहुमत असताना ४०० जागा का असा प्रश्न पडू  शकतो, पण काही कायदे असे आहेत ज्यासाठी संसदेत पक्षाला तीन चर्तुर्थांश बहुमताची गरज पडते, म्हणून भाजपाला ३० कोटी मतं लागतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी लोकांची मदत करत असताना जास्तीत जास्त मतं भाजपाच्या कमळ चिन्हासोबत कशी जोडता येतील यासाठी प्रयत्नशील राहावं असं आवाहन चंदक्रात पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले, याबाबत ईटीव्हीने बातमी दिली आहे.

लघु उद्योगांना मोदी सरकारने मदत केली

कोरोनाच्या काळातील अनेक समस्या उद्योग आघाडीने सोडवल्या. लघु उद्योजकांच्या अनेक मागण्या मोदी सरकारच्या कार्यकाळात पूर्ण करण्यात आल्या. त्यामुळे विविध सुविधा देण्यात आल्या, महाराष्ट्र सरकार असो केंद्र सरकारकडेही काहीही प्रश्न असले तरी समस्या असतील तिथे मांडल्या पाहिजेत, आंदोलन करू शकत नसाल तरी निवेदन देऊन त्या समस्या पुढे आणाव्यात, त्यामुळे उद्योग आघाडीसोबत माणूस जोडला जाईल, त्याचा फायदा निश्चितच भाजपाला होणार आहे असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

...तर मनसेसोबत युती होऊ शकते

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने कंबर कसली आहे, त्यातच शिवसेना-राष्ट्रवादीआणि काँग्रेस एकत्रित निवडणुका लढणार आहेत, त्यामुळे भाजपाची एकाकी लढाई महाविकास आघाडीसोबत असणार आहे, यातच मनसेला सोबत घेणार का? असा सवाल वारंवार पत्रकारांकडून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला जात होता, त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, मनसेने अमराठी नको ही भूमिका बदलावी, प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, मनसेत उत्तर भारतीय प्रवेश करत असतील तर आनंद आहे. मनसेच्या हिंदुत्वाबद्दल शंका नाही, त्यामुळे मनसेसोबत युती होऊ शकते असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :BJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलMNSमनसेElectionनिवडणूक