बिहारच्या निकालानंतर भाजपाचं ‘मिशन मुंबई महापालिका’; शिवसेनेसाठी ठरणार धोक्याची घंटा?

By प्रविण मरगळे | Published: November 11, 2020 05:09 PM2020-11-11T17:09:30+5:302020-11-11T17:11:06+5:30

BIhar Election Result, BMC, BJP & Shiv Sena News: भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत, त्यामुळे महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी मोठी आव्हानात्मक बनण्याची शक्यता आहे.

Bjp Will Implement Bihar Pattern In Bmc Election Says Mla Ashish Shelar opposite Shiv Sena | बिहारच्या निकालानंतर भाजपाचं ‘मिशन मुंबई महापालिका’; शिवसेनेसाठी ठरणार धोक्याची घंटा?

बिहारच्या निकालानंतर भाजपाचं ‘मिशन मुंबई महापालिका’; शिवसेनेसाठी ठरणार धोक्याची घंटा?

Next
ठळक मुद्देमुंबई महापालिका निवडणुकीत बिहार निवडणुकीसारखे परिणाम पाहायला मिळतील.शिवसेनेचं हे काँग्रेस प्रेम बिहारी जनतेला रुचलं नाही. मतदानाच्या माध्यमातून बिहारी जनतेने उत्तर दिलंकाँग्रेसला बिहारमध्ये मोठं नुकसान सहन करावं लागलं

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपाला पहिल्यांदाच राज्यात ७४ जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कुरघोडी सुरु झाली आहे. यातच बिहारमधील यशाचा पॅटर्न आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत वापरण्याची तयारी भाजपाने केली आहे.

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत, त्यामुळे महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी मोठी आव्हानात्मक बनण्याची शक्यता आहे. शेलार म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीत बिहार निवडणुकीसारखे परिणाम पाहायला मिळतील. शिवसेनेने काँग्रेससोबत आघाडी करत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, शिवसेनेचं हे काँग्रेस प्रेम बिहारी जनतेला रुचलं नाही. मतदानाच्या माध्यमातून बिहारी जनतेने उत्तर दिलं आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली ते जनतेला आवडलं नाही. त्यामुळेच काँग्रेसला बिहारमध्ये मोठं नुकसान सहन करावं लागलं, याप्रकारेच मुंबई महापालिकेत लोक शिवसेनेची साथ सोडतील असा दावा शेलारांनी केला आहे.

तसेच मुंबई महापालिका निवडणूक भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात लढवली जाईल. मुख्यमंत्रिपदावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी जी कामं केली त्याच्या आधारे आम्ही जनतेला मतदान मागणार आहोत. महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत, या निवडणुकीवर देवेंद्र फडणवीसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र अद्याप आशिष शेलारांनी मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती सांगण्यास नकार दिला. परंतु मुंबई महापालिकेत यंदा परिवर्तन नक्कीच दिसणार असा विश्वास भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे बिहार पॅटर्न?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बिहार पॅटर्न अंमलात आणण्यासाठी स्वत: देवेंद्र फडणवीस रणनीती आखत आहेत. या निवडणुकीत अशी रणनीती बनवणार असून त्यात बूथस्तरावरील भाजपा कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. विकासाचे मुद्दे, फडणवीस सरकारने केलेली कामे आणि ठाकरे सरकारचं अपयश यावर जनतेकडे मतदान मागितलं जाणार आहे. शिवसेनेत उद्धव ठाकरे वगळता अन्य कोणत्याही नेत्याचा थेट मतदारांशी संपर्क नाही. भाजपा असे बरेच नेते आहेत ज्यांचा मतदारांशी संपर्क आहे असंही भाजपा नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: Bjp Will Implement Bihar Pattern In Bmc Election Says Mla Ashish Shelar opposite Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.