शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

भाजप घेणार सहा, तर शिवसेनेला देणार दोन विधानसभा निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:39 IST

श्रीनिवास नागे । सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभेच्या तयारीला लागलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांकडून सांगली जिल्ह्यातील जागावाटपावर अंतिम हात ...

ठळक मुद्देयुतीचे सांगली जिल्ह्यातील जागावाटप निश्चित

श्रीनिवास नागे ।सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभेच्या तयारीला लागलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांकडून सांगली जिल्ह्यातील जागावाटपावर अंतिम हात फिरवण्यात येत आहे. आठपैकी सहा मतदारसंघ भाजपला, तर दोन शिवसेनेला देण्यात येणार आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत दक्षिण महाराष्टत लक्षणीय यश मिळवल्याने भाजप आणि शिवसेनेने उचल खाल्ली आहे. तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीतही एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. लोकसभेवेळी सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, माढा, सोलापूर हे पाच मतदारसंघ युतीकडे खेचून आणण्याची कामगिरी महसूलमंत्री पाटील यांनी फत्ते केली. त्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील विधानसभेच्या जागांची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

युतीच्या २००९ मधील जागावाटपाच्या सूत्रानुसार जिल्ह्यातील आठपैकी तीन मतदारसंघ भाजपकडे होते. त्यात सांगली, मिरज, जतचा समावेश होता, तर खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव हे पाच मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आले होते. २०१४ मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी खानापुरातून शिवसेनेचा, तर सांगली, मिरज, जत, शिराळ्यातून भाजपचे आमदार निवडून आले.

गेल्या पाच वर्षांत ही राजकीय परिस्थिती आणखी बदलली असून पक्षाचे वर्चस्व वाढल्याचा दावा भाजप करत आहे. त्यामुळे सांगली, मिरज, जत, शिराळ्यासह पलूस-कडेगाव आणि इस्लामपूर हे सहा मतदारसंघ भाजपने मागितले आहेत. जागांच्या तडजोडीमध्ये युतीच्या नेत्यांकडून त्यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री पाटील यांनी या सहा जागांवरील इच्छुकांना तयारीचा वेग वाढवण्यास सांगितले आहे. सांगलीतून सुधीर गाडगीळ, मिरजेतून सुरेश खाडे या विद्यमान आमदारांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.जतमध्ये आमदार विलासराव जगताप यांना पक्षांतर्गत विरोध आहे.

मात्र जगताप यांचे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ सर्वाधिक असल्याचे पक्षांतर्गत अहवालात म्हटले आहे. शिराळ्यातून आ. शिवाजीराव नाईक आणि सम्राट महाडिक इच्छुक आहेत. आ. नाईक यांच्या संस्था अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे या उमेदवारीवर सर्वाधिक खल सुरू आहे.

आता ‘लक्ष्य’ : इस्लामपूर, पलूस-कडेगावमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपूर आणि पलूस-कडेगाववर लक्ष केंद्रित केले असून, दोन्ही जागा भाजपसाठी मागून घेण्यात येत आहेत. इस्लामपुरात भाजपकडून नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राहूल महाडिक, गौरव नायकवडी इच्छुक आहेत. युतीतील घटकपक्ष रयत क्रांती संघटना भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याने त्यांच्याबाबतही चर्चा सुरू आहे. पलूस-कडेगावमधून संग्रामसिंह देशमुख यांचे नाव आधीच जाहीर करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभेच्या तयारीला लागलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांकडून सांगली जिल्ह्यातील जागावाटपावर अंतिम हात फिरवण्यात येत आहे. आठपैकी सहा मतदारसंघ भाजपला, तर दोन शिवसेनेला देण्यात येणार आहेत.

अजितराव घोरपडेंचे काय?खानापूर आणि तासगाव-कवठेमहांकाळ या दोन जागा शिवसेनेला सोडण्यात येणार असून खानापुरातून अनिल बाबर यांची उमेदवारी निश्चित आहे. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे प्रबळ दावेदार असले तरी त्यांनी भाजपकडूनच लढणार, शिवसेनेकडून नाही, असे सांगितले आहे. तथापि घोरपडेंना शिवसेनेत पाठवून उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगलीchandrakant patilचंद्रकांत पाटील