West Bengal: भाजपा टेन्शनमध्ये; 8 जिंकलेले-हरलेले आमदार, खासदार ममतांकडे परत जाण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 12:39 PM2021-06-02T12:39:55+5:302021-06-02T12:41:55+5:30

West Bengal Politics: निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर पक्षात मोठा गोंधळ उडालेला आहे. तृणमूल काँग्रेसमधून आलेले अनेक नेते आता परत जाण्याचे मार्ग शोधू लागले आहेत. भाजपा नेते तथागत रॉय यांनी निवडणूक निकालानंतर याचे भाकित केले होते.

BJP tensions in West Bengal; 8 MLAs, MPs preparing to return to Mamata Banerjee's TMC | West Bengal: भाजपा टेन्शनमध्ये; 8 जिंकलेले-हरलेले आमदार, खासदार ममतांकडे परत जाण्याच्या तयारीत

West Bengal: भाजपा टेन्शनमध्ये; 8 जिंकलेले-हरलेले आमदार, खासदार ममतांकडे परत जाण्याच्या तयारीत

Next

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजपाने (BJP) जोरदार वातावरणनिर्मिती केल्याने तृणमूलच्या अनेक बड्या नेत्यांनी तिकडे उड्या मारल्या होत्या. मात्र, आता निवडणुकीत तृणमूलने बाजी मारल्याने या नेत्यांनी पुन्हा ममतांच्या पक्षात जाण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचे वरिष्ठ नेते तथागत रॉय यांनी याची शक्यता व्यक्त केली होती. आता त्यांनी मी जे बोललेलो ते खरे ठरत आहे. दिल्लीत जाऊन वरिष्ठांना या आयाराम नेत्यांनी काय केले ते सांगणार आहे, असे म्हटले आहे. (BJP leaders wants to return in TMC after defeat, win in Election.)

 

निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर पक्षात मोठा गोंधळ उडालेला आहे. तृणमूल काँग्रेसमधून (trinamool congress) आलेले अनेक नेते आता परत जाण्याचे मार्ग शोधू लागले आहेत. माजी आमदार सोनाली गुहा, दिपेदू विश्वास यांनी पुन्हा तृणमूलमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय अन्य नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेत्यांच्या दाव्यानुसार भाजपातून जवळपास 8 जिंकलेले आमदार आणि काही खासदार तृणमूलमध्ये परत येऊ इच्छित आहेत. यामध्ये मुकुल रॉय यांचे नावही आहे. (Month After Trinamool Win, Defectors Who Joined BJP Queue Up To Return)


तृणमूल काँग्रेसमधून आलेल्या लोकांच्या परत जाण्याच्या मुद्द्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्षश दिलीप घोष यांनी सांगितले की, लोकशाहीत हे सुरु असते. काही लोक येतात, हरल्यानंतर परत जातात. काहींना त्यांच्या सुरक्षेची देखील चिंता सतावत आहे, राज्यातील हिंसाचाराच्या राजकारणाला ते घाबरत आहेत. पक्ष वाढविण्यासाठी नवीन लोकांना पक्षात घ्यावे लागते. जिंकले असते तर ठीक होते, हरले म्हणून आता त्यांना पक्षांतराचा पश्चाताप होत आहे. 

Web Title: BJP tensions in West Bengal; 8 MLAs, MPs preparing to return to Mamata Banerjee's TMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.