शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार? देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात २ तास गुप्त बैठक

By प्रविण मरगळे | Updated: September 26, 2020 18:44 IST

मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगना प्रकरणावरुन भाजपाला निशाणा साधला होता.

ठळक मुद्देशिवसेना नेते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेवर संकट?फडणवीस-राऊत यांच्या बैठकीत काय चर्चा झाली याचीच राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई – मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपात यांच्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केल्यानंतर शिवसेनेने भाजपाशी फारकत घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात कधीही न पाहिलेला सत्तासंघर्ष दिसून आला. एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र आले आणि सत्ता स्थापन केली होती.

या सर्व घडामोडीत शिवसेना नेते संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची होती. दरम्यान, आज सांताक्रुझच्या ग्रँड हयातमध्ये दुपारी १.३० ते ३.३० वाजता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. याबाबत टीव्ही ९ ने बातमी दिली आहे. ग्रँड हयातमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी काय चर्चा केली याबाबत खुलासा झाला नाही. मात्र या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्याने काही हालचाली सुरु झाल्यात का? या चर्चेला उधाण आलं आहे.

मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगना प्रकरणावरुन भाजपाला निशाणा साधला होता, सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल संजय राऊतांनी भाजपावर आरोप केले होते. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचेही नाव जोडण्यात येत होते, मात्र आदित्य ठाकरे यांनी सुशांत सिंह प्रकरणाशी माझा संबंध नाही असं पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं होतं.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी एक शायरी ट्विट केली होती, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, "किसी भी रिश्ते को कितनी भी ख़ूबसूरती से क्यों ना बाँधा जाए...अगर नज़रों में इज़्ज़त और बोलने में लिहाज़ ना हो तो वह टूट जाता है" त्यामुळे संजय राऊत यांना नेमका कोणाबाबत हा संदेश द्यायचा आहे या प्रश्न आहे. मात्र आजच्या बैठकीने हे संकेत दिलेत का अशीही चर्चा आहे. 

शिवसेना आणि भाजपा पुन्हा सत्तेसाठी एकत्र येणार?

शिवसेनेने आपल्या मूळ विचारधारेच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली, त्यानंतर मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे विराजमान झाले, मात्र सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपाने प्रयत्न केला, त्यानंतर शिवसेनेने भाजपावरही निशाणा साधला. मात्र या भेटीनंतर शिवसेना-भाजपा एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

दोन विरोधी पक्षांचे नेते कधी एका कार्यक्रमात एकत्र येणार असतील तर त्यांची भेट होते, अशाप्रकारे कोणतीही गुप्त बैठक होऊ शकत नाही, लपवाछपवी करण्याचं कारण नाही, संजय राऊत यांच्यासोबत बैठक झाली हे आम्हाला काहीही माहिती नाही, भाजपा-शिवसेना सध्या एकत्र येतील असं वाटत नाही, दोन्ही पक्ष राजकीय मार्गातून खूप दूर झाल्याचं दिसतंय, पण राजकारणात काँग्रेस-शिवसेना एकत्र येऊ शकते, तर शिवसेना-भाजपा एकत्र येऊ शकतील, पण संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एका बैठकीत शिवसेना-भाजपा जवळ येईल असं वाटत नाही असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस