शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

सिद्धिविनायक मंदिरात प्रवेशासाठी भाजपची निदर्शने; मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 02:03 IST

BJP agitation for Temple Reopening News: घरपोच दारू पोहोचवणार, त्यांना एसओपी करून देणार. पण, काळजी घेऊन मंदिर उघडायला पाहिजेत यावर सरकार कोणताही निर्णय घेत नाही हे दुर्दैवी आहे असेही दरेकर म्हणाले.

मुंबई : मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजप नेत्यांनी मंगळवारी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराबाहेर आंदोलन केले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गणपतीची आरती करत मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी दरेकर यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

मदिरालय खुले करणाऱ्या राज्य सरकारने आता मंदिराची दारे खुली करावीत या मागणीसाठी भाजपने आज सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन पुकारले होते. ‘मंदिरे बंद, उघडले बार, उद्धवा बेधुंद तुझे सरकार’ अशा घोषणांसह विविध ठिकाणी भजन, घंटानाद आणि उपोषण करण्यात आले. मंदिर उघडण्याबाबत अजूनही सरकारने निर्णय घेतलेला नाही. यासाठी सरकारला आम्ही अनेक पत्रे दिली. अनेक वेळा अर्ज केले, परंतु दुर्दैवाने हे ठाकरे सैरभैर सरकार आहे. लोकांचा आक्रोश, लोकांच्या भावना या सरकारला समजत नाहीत आणि त्यामुळे आज उद्धवा दार उघड... अशी सरकारला हाक देत आहोत. जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोचण्यासाठी घंटानाद आंदोलन करत आहोत, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली.कुठे गेले तुमचे हिंदुत्व, कुठे गेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे वैचारिक संस्कार. उद्धव ठाकरे यांचे बदलते स्वरूप या ठिकाणी दिसत आहे. घरातून कारभार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राज्यातील कोरोना प्रादुर्भावाबाबत कसलीही माहिती नाही. टीव्हीवरील माहितीनुसार ते आपल्या भूमिका मांडतात. रेस्टॉरंट आणि वाईन शॉप उघडायला प्राधान्य देणार, घरपोच दारू पोहोचवणार, त्यांना एसओपी करून देणार. पण, काळजी घेऊन मंदिर उघडायला पाहिजेत यावर सरकार कोणताही निर्णय घेत नाही हे दुर्दैवी आहे असेही दरेकर म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेTempleमंदिर