“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान

By प्रविण मरगळे | Published: September 27, 2020 10:54 PM2020-09-27T22:54:19+5:302020-09-27T22:56:18+5:30

देशभरात कोरोनाचं संकट असताना भाजपाकडून राजकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

BJP New National Secretary Anupam hajra Says Will Hug Mamata Banerjee If I Have Corona | “मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान

“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान

Next
ठळक मुद्देजर मला कोरोना संसर्ग झाला तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन.कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह रॉकेलने जाळले आहेत. आम्ही अशाप्रकारचं कृत्य कुत्रा किंवा मांजरीसोबतही करत नाही हे विधान तो व्यक्ती करु शकतो जो वेडा आणि अपरिपक्व आहे - टीएमसी

भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित राष्ट्रीय सचिव अनुपम हाजरा यांनी ममता बॅनर्जी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. जर मला कोरोनाची लागण झाली तर मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन असं हाजरा यांनी वक्तव्य केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बरुईपुर येथे रविवारी दुपारी हाजरा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.

देशभरात कोरोनाचं संकट असताना भाजपाकडून राजकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी हजारोंच्या संख्येत उपस्थित असणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांनी ना मास्क घातला होता ना सोशल डिस्टेंसिंगचं पालन करत होते. याबाबत पत्रकारांनी अनुपम हाजरा यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, आमचे कार्यकर्ते “कोविड १९ पेक्षा खूप धोकादायक आव्हानाशी लढत आहेत, ते ममता बॅनर्जी यांच्याशी लढत आहेत. कारण त्या कोविड -१९ महामारीमुळे प्रभावित नाहीत आणि त्यांना कोणाची भीती नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच जर मला कोरोना संसर्ग झाला तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन. त्यांनी या महामारीच्या पीडितांना अत्यंत चुकीची वागणूक दिली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह रॉकेलने जाळले आहेत. आम्ही अशाप्रकारचं कृत्य कुत्रा किंवा मांजरीसोबतही करत नाही असं अनुपम हाजरा यांनी सांगितले. त्याचवेळी तृणमूल कॉंग्रेसने या विधानावरुन हाजरा यांना लक्ष्य केलं आहे.  ते मानसिकदृष्ट्या अपरिपक्व असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले की, हे विधान तो व्यक्ती करु शकतो जो वेडा आणि अपरिपक्व आहे. जो मानसिकदृष्ट्या बघत असेल तो हाजरा यांचे विधान ऐकेल त्याला समजेल की तो कोणत्या प्रकारचा माणूस आहे. अनुपम हाजरा पूर्वी टीएमसीमध्ये होते. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. शनिवारी राहुल सिन्हा यांच्या जागी हाजरा यांना भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्त केले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

अपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार

बॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का? ज्योतिष्यांनी मांडली कुंडली

Video: खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंचे मोठं विधान; सर्व समाजाचे आरक्षण रद्द करा अन्...

“नेते जो आदेश देतील तो कार्यकर्ते पाळणार, राजकारणात कोणी मित्र नसतो किंवा दुश्मन नसतो”

...अन्यथा चौकाचौकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळू; धनगर समाजाची आक्रमक भूमिका

‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू

Web Title: BJP New National Secretary Anupam hajra Says Will Hug Mamata Banerjee If I Have Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.