शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाझे वर्षा बंगल्यावर वास्तव्यास होते; भाजपा खासदार नारायण राणेंचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 11:33 IST

bjp mp narayan rane makes serious allegations on cm uddhav thackeray and sachin vaze: सचिन वाझे कोणासाठी एन्काऊंटर करत होते, याची संपूर्ण माहिती माझ्याकडे; राणेंचा दावा

मुंबई: मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली आहे. देशमुख यांनी सचिन वाझेंना (Sachin Vaze) दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा सनसनाटी आरोप करणारं पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) लिहिलं आहे. यामुळे देशमुख यांच्यासह ठाकरे सरकारदेखील अडचणीत आलं असून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.मी सरकारच्या चहाचा ओशाळा नाही! राऊतांचा सूर बदलला; राज्य सरकारला दिला 'मोलाचा' सल्लापरमबीर सिंग यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. सिंग यांचे आरोप खोटे असल्याचं देशमुख आता सांगत आहेत. मग इतके दिवस ते काय करत होते? आयुक्त पदावर असताना परमबीर काय करत होते याची कल्पना देशमुख यांनी नव्हती का?, असे प्रश्न भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणेंनी (BJP MP Narayan Rane) उपस्थित केले आहेत. अनिल देशमुख यांच्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा. त्यांना एक दिवसदेखील सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असं राणे म्हणाले. (bjp mp narayan rane makes serious allegations on cm uddhav thackeray and sachin vaze)...तर आदरणीय शरद पवारांना जाब विचारायला हवा; काँग्रेस नेत्याचा थेट हल्लाबोलसचिन वाझेनं कोणासाठी एन्काऊंटर केले याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे. वाझे वर्षावर वास्तव्यास होते, असा खळबळजनक दावादेखील त्यांनी केला. मुख्यमंत्री ठाकरेच वाझे यांचे गॉडफादर आहेत. वाझे गृहमंत्री देशमुख यांच्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांना माहिती द्यायचे. त्यांना खंडणी वसुली करण्याची परवानगी ठाकरेंनीच दिली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार उरलेला नाही, असं टीकास्त्र राणेंनी सोडलं.परमबीर सिंगांच्या पत्रामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट?; भाजपच्या बड्या नेत्याचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाणसचिन वाझेसारखा सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करतो. व्यवसायिक मनसुख हिरेन यांची दिवसाढवळ्या हत्या करतो आणि असा अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा असतो. मुख्यमंत्री त्याची पाठराखण करतात. तो मुख्यमंत्र्यांना अगदी संत सज्जन वाटतो, अशा शब्दांत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधलं. महाविकास आघाडी सरकारचं केवळ कमवायला सत्तेत आलं आहे. यांच्या चौकशा झाल्या तर उत्तकं देताना यांना आयुष्य अपुरं पडेल, असा घणाघात त्यांनी केला.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेUddhav Thackerayउद्धव ठाकरेParam Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुखNarayan Raneनारायण राणे