वाझे वर्षा बंगल्यावर वास्तव्यास होते; भाजपा खासदार नारायण राणेंचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 11:31 AM2021-03-21T11:31:12+5:302021-03-21T11:33:24+5:30

bjp mp narayan rane makes serious allegations on cm uddhav thackeray and sachin vaze: सचिन वाझे कोणासाठी एन्काऊंटर करत होते, याची संपूर्ण माहिती माझ्याकडे; राणेंचा दावा

bjp mp narayan rane makes serious allegations on cm uddhav thackeray and sachin vaze | वाझे वर्षा बंगल्यावर वास्तव्यास होते; भाजपा खासदार नारायण राणेंचा खळबळजनक आरोप

वाझे वर्षा बंगल्यावर वास्तव्यास होते; भाजपा खासदार नारायण राणेंचा खळबळजनक आरोप

Next

मुंबई: मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली आहे. देशमुख यांनी सचिन वाझेंना (Sachin Vaze) दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा सनसनाटी आरोप करणारं पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) लिहिलं आहे. यामुळे देशमुख यांच्यासह ठाकरे सरकारदेखील अडचणीत आलं असून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.

मी सरकारच्या चहाचा ओशाळा नाही! राऊतांचा सूर बदलला; राज्य सरकारला दिला 'मोलाचा' सल्ला

परमबीर सिंग यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. सिंग यांचे आरोप खोटे असल्याचं देशमुख आता सांगत आहेत. मग इतके दिवस ते काय करत होते? आयुक्त पदावर असताना परमबीर काय करत होते याची कल्पना देशमुख यांनी नव्हती का?, असे प्रश्न भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणेंनी (BJP MP Narayan Rane) उपस्थित केले आहेत. अनिल देशमुख यांच्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा. त्यांना एक दिवसदेखील सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असं राणे म्हणाले. (bjp mp narayan rane makes serious allegations on cm uddhav thackeray and sachin vaze)

...तर आदरणीय शरद पवारांना जाब विचारायला हवा; काँग्रेस नेत्याचा थेट हल्लाबोल

सचिन वाझेनं कोणासाठी एन्काऊंटर केले याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे. वाझे वर्षावर वास्तव्यास होते, असा खळबळजनक दावादेखील त्यांनी केला. मुख्यमंत्री ठाकरेच वाझे यांचे गॉडफादर आहेत. वाझे गृहमंत्री देशमुख यांच्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांना माहिती द्यायचे. त्यांना खंडणी वसुली करण्याची परवानगी ठाकरेंनीच दिली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार उरलेला नाही, असं टीकास्त्र राणेंनी सोडलं.

परमबीर सिंगांच्या पत्रामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट?; भाजपच्या बड्या नेत्याचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण

सचिन वाझेसारखा सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करतो. व्यवसायिक मनसुख हिरेन यांची दिवसाढवळ्या हत्या करतो आणि असा अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा असतो. मुख्यमंत्री त्याची पाठराखण करतात. तो मुख्यमंत्र्यांना अगदी संत सज्जन वाटतो, अशा शब्दांत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधलं. महाविकास आघाडी सरकारचं केवळ कमवायला सत्तेत आलं आहे. यांच्या चौकशा झाल्या तर उत्तकं देताना यांना आयुष्य अपुरं पडेल, असा घणाघात त्यांनी केला.

Web Title: bjp mp narayan rane makes serious allegations on cm uddhav thackeray and sachin vaze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.