शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

का सोडला काँग्रेसचा 'हात'; केव्हापासून पाहत होते वाट?; जितिन प्रसाद यांनी केला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 21:14 IST

Jitin Prasad : काही दिवसांपूर्वीच जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये केला होता प्रवेश. आम्ही जनतेत राहतो, म्हणूनच त्यांना काय हवं याची कल्पना, प्रसाद यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये केला होता प्रवेश. आम्ही जनतेत राहतो, म्हणूनच त्यांना काय हवं याची कल्पना, प्रसाद यांचं वक्तव्य.

काही दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. त्यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये का प्रवेश केला याचं कारण स्पष्ट केलं आहे. "आपण भाजपमध्ये येण्यासाठी भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी कोणत्याही प्रकारची डील केली नाही," असं जितिन प्रसाद यांनी स्पष्ट केलं. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर भाजपामध्ये सामील होणारे जितिन प्रसाद हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले दुसरे नेते आहेत. "आमच्या तीन पिढ्यांनी काँग्रेसची सेवा केली आहे. परंतु हळूहळू काँग्रेसमध्ये राहणं हे कठीण झालं होतं. मला वाटतं जनता ही नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. मी भाजपमध्ये राहून जनतेची सेवा करू शकतो," असं जितिन प्रसाद म्हणाले. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. आम्ही जनतेमध्ये राहणारे आहोत आणि जनतेला काय हवं हे आम्हा जाणतो, असंही ते म्हणाले.जितिन प्रसाद यांनी राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या अन्य कोणत्याही नेत्यावर भाष्य केलं नाही. "योगी आदित्यनाथ यांच्यासोबत राहून अधिक काम मी करू शकेन आणि पक्ष जे काही काम देईल ते मी करेन," असंही त्यांनी नमूद केलं. "काँग्रेसनं काहीच केलं नाही, असं वक्तव्य मी कधीही केलं नाही. मला मंत्रिमंडळातील मंत्री बनून सेवा करण्याची संधी मिळाली. परंतु मला असं वाटतं की भाजप सोडला तर अन्य पक्ष कोणत्या विशेष व्यक्तीच्याच आसपास फिरताना दिसतात," असंही त्यांनी नमूद केलं.

कोण आहेत जितिन प्रसाद?

जितिन प्रसाद हे माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद (शाहजहाँपूर, उत्तर प्रदेश) यांचे पुत्र आहेत. राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांचे निकटवर्तीय असलेले जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्याविरुद्ध काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही लढविली होती.जितिन प्रसाद हे २००४ मध्ये शाहजहाँपूर आणि २००९ मध्ये धौरहर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये ते युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री व नंतर पोलाद, मार्ग परिवहन आणि महामार्ग राज्यमंत्री होते. २०११-१२ पर्यंत पेट्रोलियम आणि २०१२-१४ पर्यंत मनुष्यबळ विकास राज्यमंत्री होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.

टॅग्स :Amit Shahअमित शहाj. p. naddaजे. पी. नड्डाcongressकाँग्रेसBJPभाजपाJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे