शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

१७ सेकंदांत २७ वेळा 'कमळ, कमळ, कमळ'; 'ब्रेथलेस' भाजपा नेत्याचा Video व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 12:45 IST

सुरुवातीला १७ सेकंदांत २७ वेळा कमळ म्हणणाऱ्या विनित अग्रवाल शारदा यांनी शेवटच्या १८ सेकंदांतही ६ वेळा कमळ शब्द उच्चारला.

ठळक मुद्देस्टार प्रचारकांच्या सभा गाजत आहेतच, पण अनेक वाचाळवीरांच्या वादग्रस्त विधानांवरूनही 'कल्ला' होतोय. नेत्याचा आविर्भाव पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा देशभर उडू लागलाय. स्टार प्रचारकांच्या सभा गाजत आहेतच, पण अनेक वाचाळवीरांच्या वादग्रस्त विधानांवरूनही 'कल्ला' होतोय. आपलं भाषणकौशल्य दाखवण्यासाठी अनेक नेते नवनवे प्रयोग करताना दिसत आहेत. असाच एक 'ब्रेथलेस' प्रयोग उत्तर प्रदेशातील भाजपाच्या सभेत पाहायला मिळाला. 'कमळा'लाच मत देण्याचं आवाहन करताना एका उत्साही नेत्यानं १७ सेकंदांत २७ वेळा कमळ, कमळ, कमळ म्हटलं. त्याला धाप लागली, पण तो थांबला नाही. या भाषणाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झालीय. त्यातील नेत्याचा आविर्भाव पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. 

मेरठमधीलभाजपाचे पदाधिकारी विनिती अग्रवाल शारदा यांनी राजेंद्र अग्रवाल यांच्या प्रचारसभेत दणदणीत भाषण केलं. मोदी सरकारचं गुणगान गात त्यांनी भाजपासाठी मतांचा जोगवा मागितला. त्यावेळी, जाता-जाता त्यांच्यात एक वेगळाच उत्साह संचारल्याचं पाहायला मिळालं. खालील व्हिडीओत तो तुम्ही प्रत्यक्षच बघा...

सुरुवातीला १७ सेकंदांत २७ वेळा कमळ म्हणणाऱ्या विनित अग्रवाल शारदा यांनी शेवटच्या १८ सेकंदांतही ६ वेळा कमळ शब्द उच्चारला. कमळासमोरचं बटण इतक्यांदा दाबा की मोदी रामाच्या रूपात प्रकट झाले पाहिजेत, असं अजब आवाहनही त्यांनी केलं. ते ऐकून सगळेच चक्रावले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हेही यावेळी उपस्थित होते. 

दरम्यान, उत्तर प्रदेशातील भाजपा नेते जयकरण गुप्ता यांनी प्रियंका गांधींवर त्यांच्या पेहेरावावरून आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. 'स्कर्टवाली बाई साडी नेसून मंदिरात डोकं टेकू लागली, जे गंगाजलाला निषिद्ध मानायचे तेच आज गंगेच्या पाण्याचं आचमन करू लागले, हे अच्छे दिन नाहीत का?', अशी वादग्रस्त टिप्पणी त्यांनी केली. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019meerut-pcमेरठBJPभाजपा