शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

"... मात्र राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवण्याची सवय जात नाही"

By जयदीप दाभोळकर | Published: January 18, 2021 1:08 PM

शिवसेनेचा पश्चिम बंगालच्या निवडणुका लढण्याचा निर्णय, भाजपा नेत्यानं लगावला टोला

ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या निवडणुकीत उतरण्याचा शिवसेनेचा निर्णयभाजपा नेत्याची शिवसेनेवर घणाघाती टीका

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय रणधुमाळी सुरू आहे. बंगालच्या या रणधुमाळीत आता शिवसेनाही ‘जय बांगला’ म्हणत शड्डू ठोकणार आहे. शिवसेनापश्चिम बंगालच्या निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केली. दरम्यान, त्यांच्या या निर्णयानंतर अनेक स्तरातून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. "महाराष्ट्रात शिवसेनेला २०१९ मध्ये युती करून सुद्धा फक्त १६% मतं मिळाली पण संजय राऊत यांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही," असं म्हणत निलेश राणे यांनी त्यांना टोला लगावला. निलेश राणे यांनी शिवसेनेनं निवडणुका लढवलेल्या ठिकाणची आकडेवारीदेखील मांडली आहे. "बिहार निवडणुक - नोटा १.६८%, शिवसेनेला ०.०५% मतं, गोवा निवडणुक - शिवसेनेनं ४० पैकी फक्त ३ उमेदवार उभे केले आणि त्या ३ उमेदवारांची एकूण मतं ७९२. महाराष्ट्रात शिवसेनेला २०१९ मध्ये युती करून सुद्धा फक्त १६% मतं मिळाली. पण संजय राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही," असं म्हणत राणे यांनी राऊतांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा साधला. 

यापूर्वी डिपॉझिटही जप्त"शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात दाखल होऊ. जय हिंद, जय बांगला’," असे ट्वीट करत संजय राऊत यांनी बंगाल निवडणुकांची घोषणा केली. शिवसेना बंगालच्या रणधुमाळीत उतरणार असली, तरी नेमक्या किती ठिकाणी उमेदवार उतरवणार, उद्धव ठाकरे प्रचारासाठी बंगालमध्ये जाणार का, याबाबत कोणताही तपशील संजय राऊत यांनी दिलेला नाही. 

यापूर्वीच्या लढती यापूर्वी शिवसेनेने उत्तर प्रदेशसह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आदी राज्यांत निवडणूक रिंगणात उमेदवार उतरवले होते. अलीकडेच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावरून वाद झाल्याने तुतारी वाजविणाऱ्या मावळ्याचे चिन्ह घेऊन शिवसेनेने २२ उमेदवार दिले होते. मात्र, एकाही जागी शिवसेनेला डिपॉझिटही राखता आले नाही. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकGujaratगुजरातHaryanaहरयाणाMadhya Pradeshमध्य प्रदेशgoaगोवा