शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

चार खासदार असलेल्या पक्षाच्या अध्यक्षांना लोकनेते म्हणता, मग...; पडळकरांची पवारांवर टीका

By कुणाल गवाणकर | Updated: November 23, 2020 15:21 IST

राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर सरसावले

सांगली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतर आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी पवारांवर शरसंधान साधलं आहे. ज्या पक्षाचे ४ खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता. मग ३०३ खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, असा सवाल त्यांनी विचारला आहे. सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील यांचे संतुलन ढासळलेले - हसन मुश्रीफतुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली, तर इतका त्रागा का करता, असा प्रश्न गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारला आहे. सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांचा प्रचारासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात पडळकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते....तरच मनसेशी युती करू; चंद्रकांत पाटील यांनी सांगितली महत्त्वाची अटगोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं. आपण कोणावर टीका करतोय याचा अभ्यास चंद्रकांत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी करायला हवा. त्यांनी शरद पवारांचं कर्तृत्व पाहायला हवं. वयाच्या ३६ व्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले. गेल्या ५० वर्षांपासून ते संसदीय राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे टीकाकारांनी एकदा स्वत:ला पवारांसमोर तपासून पाहायला हवं, असं परब म्हणाले. पडळकर यांच्यावर भाजपचे संस्कार नाहीत. भाजपमधील व्यक्ती अशी बोलणार नाहीत. हा भाजपमधील भेसळीचा परिणाम आहे, असा टोला त्यांनी लगावला.मला चंपा आणि फडणवीसांना टरबूज म्हणता त्याचं काय? चंद्रकांत पाटलांचा सवाल

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी एका मेळाव्यात केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असंदेखील पाटील म्हणाले होते. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर चांगलीच तोफ डागली होती.

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा