शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? खुद्द एकनाथ खडसेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की...

By प्रविण मरगळे | Updated: September 23, 2020 17:32 IST

भाजपा नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठळक मुद्देएकनाथ खडसे यांच्याबाबत अधिकृत भाष्य करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा नकार राष्ट्रवादी प्रवेशाच्या बातमीबाबत काही तथ्य नसल्याचा खडसेंचा खुलासा जे काही होईल ते समोर येईल, अद्याप खडसेंबाबत कोणतीही चर्चा नाही - नवाब मलिक

प्रविण मरगळे

मुंबई – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशाप्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या उत्तर महाराष्ट्रातील काही स्थानिक नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत माहिती जाणून घेण्यात आल्याची बातमी होती. एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून भाजपात नाराज आहेत त्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार सतीश पाटील आणि जळगाव जिल्हाध्यक्ष हे उपस्थित होते. त्यात जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे बडे नेते एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशावर चर्चा झाल्याचं बोललं जातं. मात्र याबाबत कोणीही स्पष्ट बोलण्यास तयार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी अधिक भाष्य न करता यात तथ्य नाही असं उत्तर देत माझं काम सुरुच आहे, सध्या पुस्तक लिहिण्याचं काम करतोय असं त्यांनी ‘लोकमत ऑनलाइन’शी बोलताना सांगितले. तर एकनाथ खडसे यांच्याबाबत अधिकृत भाष्य करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नकार दिला आहे. जे काही होईल ते समोर येईल, अद्याप खडसेंबाबत कोणतीही चर्चा नाही असं मंत्री नवाब मलिकांनी सांगितले आहे.

खडसेंचा विचार म्हणजे अंबुजा सिमेंटची दिवार, दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही; भाजपा नेत्याचा दावा

खडसे दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही

माझ्या आयुष्यात राजकारणाची किंवा व्यक्ती समजण्यासाठी थोडी समज असेल तर एकनाथ खडसे दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही. खडसेंचे काम विचारासाठी आहे ते व्यक्तीसाठी नाही. खडसेंना विधानसभा निवडणुकीवेळीही अनेक ऑफर आल्या पण त्यांनी पक्ष सोडला नाही. त्यांच्या विचाराची श्रद्धा ही अंबुजा सिमेंटच्या दिवारासारखी तुट सकती है पण विचारांची श्रद्धा तुटू शकत नाही. संवादाच्या माध्यमातून सगळे प्रश्न सुटतील. आमच्या आधीपासून त्यांनी पक्षासाठी भरपूर काही केलं आहे. त्यांचा त्यागाचा सन्मान आहे. भाजपा पक्ष नाही तर परिवार आहे, असे विचार मनात आणू नका असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना दावा केला आहे.

खडसेंबाबत निव्वळ अफवा

एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ आणि जुने-जाणते नेते आहेत. पक्षानं आतापर्यंत त्यांना भरभरून दिलं आहे. त्यामुळे भाजपचं नुकसान होईल अशी कोणतीही भूमिका ते घेणार नाहीत,'खडसे असं काही करणार नाहीत, 'नाथाभाऊंबद्दल यापूर्वीही अनेकदा अशा चर्चा झाल्या होत्या. मात्र, त्या अफवाच ठरल्या होत्या असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

काय म्हणाले होते एकनाथ खडसे?

माझ्यावर केवळ आरोप झाले म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं. मग आरोप झालेल्या पक्षाच्या इतर मंत्र्यांना तो न्याय का लावला गेला नाही, असा सवाल भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी उपस्थित केला होता. पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला. मग अ‍ॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो काय पदाचा सदुपयोग होता का? असा प्रश्न खडसेंनी विचारला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेत वळवण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस अ‍ॅक्सिस बँकेत काम करतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप झाला होता. तोच मुद्दा खडसेंनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीसांना मी मोठं केलं, पण...

देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष कसे झाले, हेदेखील एकनाथ खडसेंनी सांगितलं होतं. 'मी देवेंद्र फडणवीस यांना २००५-२००६ पासून पाहतोय. ते अभ्यासू आणि होतकरू असल्यानं त्यांना मी संधी दिली. अनेकदा विधानसभेत माझ्या ऐवजी त्यांना पुढे केलं. पण आपण ज्यांच्यावर प्रेम केलं, ते पुढे जाऊन असे उतराई होतील असं वाटलं नव्हतं,' अशा शब्दांत खडसेंनी नाराजी व्यक्त केली. 'सुधीर मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष असताना चांगलं काम करत होते. मात्र त्यांचा कार्यकाळ संपत आला. त्यांनाच पुन्हा संधी दिली जावी, असं राज्य भाजपामधील अनेकांना वाटत होतं. त्यावेळी राजनाथ सिंह पक्षाचे अध्यक्ष होते. एकदा गोपीनाथ मुंडे माझ्याकडे आले. देवेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची शिफारस तुम्ही सिंह यांच्याकडे करा, असं मुंडे म्हणाले. गोपीनाथजी माझे नेते होते. मी त्यांचा सन्मान केला. राजनाथ यांना फोन करून मी देवेंद्र यांचं नाव सुचवलं आणि मग देवेंद्र प्रदेशाध्यक्ष झाले,' अशा शब्दांत खडसेंनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

देव तारी त्याला कोण मारी! खेळता खेळता २ वर्षाच्या बहिणीला भावाने रेल्वेसमोर फेकले, तितक्यात...

“महाराष्ट्र अस्मिता अन् मराठी माणसासाठी लढलो म्हणून तुरुंगात टाकणार असाल तर माझी तयारी"

भाजपाचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?; खासदार शरद पवारांची महत्त्वाची बैठक सुरु

...पण तरीही ते 'घरी'च, दार उघड भावा दार उघड! विरोधकांचा उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारnawab malikनवाब मलिक