शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जो पक्ष स्वत:चा अध्यक्ष ठरवू शकत नाही, तो पुढचे निर्णय काय घेणार?; फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 13:50 IST

राज्य सरकारमध्ये प्रचंड अंतर्विरोध; एक दिवस हे सरकार पडेल; देवेंद्र फडणवीस यांचं महाविकास आघाडीतील कुरबुरींवर भाष्य

मुंबई: महाविकास आघाडीबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांचं काय मत आहे याकडे आम्ही लक्ष देणार नाही. जो पक्ष स्वत:चा अध्यक्ष ठरवू शकत नाही, तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. राज्य सरकारमधील कुरबुरी, काँग्रेसची नाराजी, राष्ट्रीय अध्यक्षपदावरून सुरू असलेला वाद यावरून फडणवीसांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेसच्या अध्यक्षपदाबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भावी अध्यक्ष गांधी कुटुंबातील असावा की बाहेरील, यावरून पक्षात दोन गट पडले आहेत. देशभरातील काँग्रेसचे नेतेही त्यांची मतं मांडत आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतेही यात मागे नाहीत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांच्या नावाला ठाम पाठिंबा दिला आहे. वडेट्टीवार यांनी तर त्यांच्याही पुढे जाऊन अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितल्यास राज्यातील सत्ताही सोडू, असं विधान केलं आहे. त्यामुळे राज्यातील सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं.वडेट्टीवारांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारला असता, या सगळ्याकडं आता आम्ही फार लक्ष देत नाही. एका अध्यक्षपदावरून त्यांच्यात इतके वाद सुरू आहेत. सोनिया गांधींना अध्यक्षपदी राहायचं नाही. पण त्यांनाच राहावं लागतं आहे. जे अध्यक्ष पदाचा निर्णय घेऊ शकत नाहीत, ते पुढचे निर्णय कसे घेणार?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. इतक्या मोठ्या पक्षाची अशी अवस्था का झाली याचं आत्मचिंतन करायला हवं, असंदेखील ते म्हणाले.महाविकास आघाडी सरकार ही अनैसर्गिक आघाडी आहे. त्यांच्यात खूप अंतर्विरोध आहे. त्यामुळे सरकार जितके दिवस चाललंय, तितके दिवस चालेल आणि एक दिवस जाईल. ही आघाडी नैसर्गिक नाही. अशी आघाडी देशाच्या राजकारणात फार काळ कधीच चाललेली नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं.वीरप्पा मोईली म्हणाले, सोनिया गांधी आम्हाला मातेसमान, पण...पिक्चर अभी बाकी है! काँग्रेसमधील घमासान सुरू; कपिल सिब्बल यांचं सौम्य, पण सूचक ट्विटसोनिया गांधीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष; कार्यकारिणीचे शिक्कामोर्तब

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार