शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

इच्छा तिथे मार्ग, टाईमपास तिथे कांजुरमार्ग; 'मेट्रो'वरून फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

By कुणाल गवाणकर | Updated: November 18, 2020 20:29 IST

मेट्रो कारशेड प्रकल्प आरेतून कांजुरमार्गला नेण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाचा फडणवीस यांच्याकडून समाचार

मुंबई: आरेतीलमेट्रोचं कारशेड कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेणाऱ्या ठाकरे सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. इच्छा तिथे मार्ग, असा एक वाकप्रचार आहे. मात्र आता इच्छा तिथे मार्ग, टाईमपास तिथे कांजुरमार्ग असं म्हणायला हवं, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.मेट्रोचं कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी घेतला. मेट्रो प्रकल्प भूमिगत करण्याचं तेव्हाच ठरलं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार जाण्याआधी हा निर्णय घेण्यात आला. आमचं सरकार आल्यानंतर आरेतील केवळ २५ एकर जागा घेऊन कारशेड करण्याचा निर्णय घेतला गेला, असं फडणवीस यांनी सांगितलं. आरेतील कारशेडला विरोध होऊ लागल्यानं आमच्या सरकारनं कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. एक समिती स्थापन केली. कांजुरमार्गची जागा मिळत असेल तर प्रकल्पाचा खर्च वाढेल. कांजूरमार्गची जागा लिटिगेशनमध्ये असल्यानं ती जागा मिळवण्यासाठी बराच अवधी जाईल. कांजूरमार्गची जागा ३ महिन्यांत मिळणार नसेल, तर मग आरे हाच पर्याय उत्तम पर्याय असल्याचा अहवाल समितीनं दिला होता, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. यानंतर आरेतील कारशेडचं प्रकरण उच्च न्यायालयात गेलं. २६०० कोटी रेडी रेकनरप्रमाणे जमा करणाच्या सूचना न्यायालयानं दिल्या. या सगळ्यामुळे ९ महिन्यांचा विलंब झाला. त्यावेळी मेट्रो प्रकल्पातल्या ४० ते ४५ टक्के बोगद्यांचं काम झालं होतं. त्यामुळे प्रकल्पाला दिलेली स्थगिती आम्ही हटवली. महाविकास आघाडी सरकारनं स्थापन केलेल्या समितीनंदेखील कांजूरमार्गला कारशेड केल्यास प्रकल्प पूर्ण करण्यास उशीर होईल आणि खर्चही वाढेल, असा अहवाल दिला आहे. आरेत कारशेड झाल्यास २०२१ पर्यंत मेट्रो धावू लागेल. पण कारशेड कांजूरला गेल्यास २०२४ पर्यंतही प्रकल्प पूर्ण होऊ शकणार नाही. यासोबतच दर दिवशी व्याजापोटी ५ कोटींचा बोजा पडेल, अशी आकडेवारी फडणवीसांनी दिली.  ठाकरे सरकारनं केवळ आणि केवळ अहंकारापोटी कारशेडचा प्रकल्प आरेतून कांजूरला नेल्याचं फडणवीस म्हणाले. प्रकल्प कांजूरला नेल्यानं एक पैसा अधिक खर्च होणार नाही हे मुख्यमंत्री कोणत्या आधारावर बोलतात. आरेमध्ये तुम्ही बांधकामच करणार नाहीत का, याचं उत्तर सरकारनं द्यावं. कारण तिथे बांधकाम होणारच आहे. ग्रीन डेपो उभारला जाणार आहे. कांजूरला प्रकल्प नेल्यानं खर्च वाढेल असा अहवाल सरकारनं नेमलेल्या समितीनेच दिला आहे. हा पैसा तुमच्या घरचा आहे का? जनतेच्या पैशाची लूट करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?, असे सवाल फडणवीस यांनी उपस्थित केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMetroमेट्रोUddhav Thackerayउद्धव ठाकरेAarey Coloneyआरे