शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

येर गबाळ्याचे काय काम; तुकोबांचा अभंग म्हणत फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 15:27 IST

bjp leader devendra fadnavis lashes out at thackeray government: कोरोना संकटातील नियोजनापासून एफडीआयपर्यंत; विविध मुद्द्यांवरून फडणवीसांनी घेतला ठाकरे सरकारचा समाचार

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (bjp leader devendra fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोश्यारींना सरकारनं दिलेलं भाषण एखादं चौकातलं भाषण वाटतं. त्यात यशोगाथाच नव्हे, केवळ आणि केवळ व्यथाच दिसतात, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) लक्ष्य केलं आहे.ठाकरे सरकारचं काम कसं चाललंय?; फडणवीसांनी सांगितली 'एका स्टूल खरेदी'ची भन्नाट गोष्टराज्य सरकारनं राज्यपालांना दिलेल्या भाषणात आम्ही हे केलं आणि ते केलं, याचाच उल्लेख केला. कोविड सेंटर्स उभारली, जम्बो कोविड सेंटर्स बांधली, प्रयोगशाळ्या उभारल्या, अशा गोष्टी राज्यपालांच्या भाषणात होत्या. पण आकडेवारी अजिबात नव्हती. सरकारनं केलेल्या उपाययोजनांमुळे किती जणांचे प्राण वाचले, किती जणांच्या चाचण्या झाल्या, याची कोणतीही आकडेवारी सरकारनं दिली नाही. किमान या कोविड सेंटर्समुळे किती जणांची घरं भरली, याची तरी माहिती द्यायला हवी होती, असा टोला त्यांनी लगावला.फडणवीसांचे प्रश्न अन् उपमुख्यमंत्र्यांची तात्काळ घोषणा; वीज ग्राहकांसाठी सरकारचा मोठा निर्णयशेतकरी प्रश्न, त्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई, थेट परकीय गुंतवणूक, वीज बिल यासारख्या अनेक विषयांवरून फडणवीसांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. त्यांनी भाषणाच्या शेवटी संत तुकारामांच्या अभंगाचा दाखला दिला. 'नका दंत कथा येथे सांगो कोणी ! कोरडे ते मानी बोल कोण !! अनुभव येथे पाहिजे साचार ! न चलती चार आम्हांपुढे !!वरी कोण मानी रसाळ बोलणे ! नाही झाली मने ओळखी तो !!निवडी वेगळे क्षीर आणि पाणी ! राजहंस दोन्ही वेगळाली !!तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ! येर गबाळ्याचे काय काम !!संत तुकोबांच्या अभंगाचा संदर्भ देत फडणवीसांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं.

फडणवीसांनी सांगितली स्टूल खरेदीची गोष्टतीन पक्षांचं सरकार अनेक गोष्टींमध्ये दिरंगाई करत असल्याची टीका त्यांनी केली. 'एखादा विभाग स्टूल खरेदीसाठी मंत्रालयाशी पत्रव्यवहार करतो. मग मंत्रालयाकडून त्या विभागाला तुम्ही स्टूलची उंची किती हवी तेच नमूद केली नसल्याचं पत्रातून कळवलं जातं. उंची नमूद केल्यावर स्टूल लाकडी हवा की लोखंडी की फायबरचा याबद्दल मंत्रालयातून विचारणा होते. त्याला पत्रानं उत्तर दिल्यावर स्टूलाला किती पाय हवेत असा प्रश्न विचारला जातो. मग पुन्हा स्टूलाचं वजन किती हवं याची विचारणा होते. शेवटी तो स्टूल काही संबंधित विभागाला मिळत नाही. मग एखादी घटना घडल्यावर मंत्रालयातून स्टूलाबद्दल विचारलं जातं. तेव्हा संबंधित विभाग पत्रव्यवहाराचे इतके कागद झाले की आम्ही आता त्यांचाच स्टूल म्हणून वापर करत असल्याचं सांगतो,' असा किस्सा सांगत फडणवीसांनी ठाकरे सरकारला चिमटा काढला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या