शहरं
Join us  
Trending Stories
1
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
2
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
3
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
4
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
5
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
6
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
7
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
8
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
9
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
10
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
11
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
12
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
13
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
14
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
15
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
16
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
17
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
18
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
19
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
20
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?

Maharashtra Vidhan Sabha: गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात देवेंद्र फडणवीसांकडून हक्कभंग दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 1:26 PM

devendra fadnavis gave breach of privilege motion against anil deshmukh: अन्वय नाईक मृत्यू प्रकरणात देशमुखांनी विधानसभेत केले होते फडणवीसांवर गंभीर आरोप

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. अनिल देशमुख यांनी काल अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण (Anvay Naik Death Case) दाबल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता. त्या प्रकरणी फडणवीस यांनी देशमुख यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली. (devendra fadnavis gave breach of privilege motion against anil deshmukh)सचिन वाझेंवरुन राजकारण तापलं; गृहमंत्र्यांचा शरद पवारांना कॉल, दिला महत्त्वाचा सल्ला

देशमुख यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला. 'अन्वय नाईक यांची हत्या झाली नसून आत्महत्या आहे. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी निकाल देताना आत्महत्येस प्रवृत्त केलं नसल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबलं असं म्हणणं चुकीचं आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सभागृहातदेखील सांगितला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असतानाही अशा प्रकारचं विधान देशमुख यांनी केलं. हे विधान न्यायालयाचा अवमान करणारं असल्याचं फडणवीस म्हणाले. अनिल देशमुख यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे असून ते त्यांनी जाणूनबुजून केले आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. अन्वय नाईक यांच्याबद्दल केलेलं विधान अनिल देशमुख यांनी एकदा केले नसून त्यांची पुनरावृत्ती केली. सदर वक्तव्य करून त्यांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्याचा भंग त्यांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण विशेष हक्कभंग समितीकडे पाठवावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. 'आज त्यांना आम्ही सोडणार नाही'; विरोधक आक्रमक, अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजणार

अन्वय नाईक प्रकरणात माझी चौकशी करा, असं खुलं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला काल दिलं होतं. 'अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांचं थोबाड अक्षरश: काळं झालं आहे. जो तपास केला, त्यावर ताशेरे ओढले ते गृहमंत्री विसरले वाटतं. गृहमंत्र्यांनी हा तपास पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही हे उत्तर आहे. अन्वय नाईक प्रकरणात त्यांनी माझी चौकशी जरुर करावी, पण अन्वय नाईक यांच्या जमिनी कोणी कोणी विकत घेतल्या याचीही चौकशी त्यांनी करावी,' अशी मागणी त्यांनी केली.   

टॅग्स :Anvay Naikअन्वय नाईकAnil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस