शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अजित दादांचा राजीनामा मागायचा तर सरळ मागा; द्राविडी प्राणायम कशाला?; भाजप नेत्याचा नवाब मलिकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 13:27 IST

Pandharpur Byelection : पंढरपूर निवडणुकांत महाविकास आघाडीला पत्करावा लागला होता पराभव. पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर मोदी, अमित शाहंनी राजीनामा देण्याची मलिक यांनी केली होती मागणी.

ठळक मुद्देपंढरपूर निवडणुकांत महाविकास आघाडीला पत्करावा लागला होता पराभव.पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर मोदी, अमित शाहंनी राजीनामा देण्याची मलिक यांनी केली होती मागणी.

देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. यात पश्चिम बंगालच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचं आव्हान फोडून काढत घवघवीत यश प्राप्त केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जींचेच सरकार येणार असल्याचं निश्चित झालं आहे. पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला. आपली प्रसिद्धी होईल यासाठीच काम करणार ही कार्यपद्धत अयोग्य; नवाब मलिकांचा मोदींवर निशाणा"पश्चिम बंगालमधील मतदारांनी नाकारल्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, असं  नवाब मलिक म्हणाले. अहो, नवाब मलिक अजित दादांचा राजीनामा मागायचाय तर सरळसरळ मागा. हे द्राविडी प्राणायम कशाला?," असं म्हणत भातखळकर यांनी नवाब मलिकांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला.  पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदरवाराला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या ठिकाणी अनेक दिग्गजांनी सभाही घेतल्या होत्या. "पंढरपूरमधील महाभकास आघाडीचा पराभव म्हणजे ठाकरे सरकारला लोकांनी नाकारले असे मी म्हणणार नाही. यांना स्वीकारले कोणी होते? हे जबरदस्तीने जनतेच्या डोक्यावर बसले. समाधान आवताडे यांचा विजय हा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या अचूक रणनीतीचा परिणाम आहे," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारnawab malikनवाब मलिकAtul Bhatkalkarअतुल भातखळकरPandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा