शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
4
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
5
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
6
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
7
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
8
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
9
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
10
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
11
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
12
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
13
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
14
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
15
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
16
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
17
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
18
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
19
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
20
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS

आपल्या क्षेत्राबाहेर जास्त लुडबूड केली की अशी ट्रिटमेंट मिळते; व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याचा पवारांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 19:10 IST

आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा सल्ला यापूर्वी शरद पवारांनी दिला होता

ठळक मुद्देआपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा सल्ला यापूर्वी शरद पवारांनी दिला होतासेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांनी दिले आदेश

गेल्या अनेक दिवसांपासून नव्या शेतकरी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, रिहाना, ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा यांसह काही जणांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन देणारी ट्वीट केली होती. त्याला प्रत्युत्तर देत हा देशाचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सांगत देशातील काही सेलिब्रिटींनीही ट्वीट केली होती. यानंतर काही जणांनी त्याचा विरोध केला. तर काही जणांनी सेलिब्रिटींच्या ट्वीटला समर्थनही दिलं. दरम्यान, राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरला आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत शरद पवार यांना टोला लगावला आहे. अतुल भातखळकर यांनी एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यात शरद पवार हे आयसीसी चॅम्पिअनशीपची ट्रॉफी घेऊन मंचावर उभे आहेत. तसंच त्यांच्या पाठी ऑस्ट्रेलियन संघाचे खेळाडूही आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि अन्य खेळाडू यात शरद पवार यांच्यासह चुकीच्या पद्धतीनं वागत असल्याचं दिसत आहे. तसंच ट्रॉफी हाती दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी त्यांना बाजूला होण्यासही सांगितल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. "आपल्या क्षेत्राबाहेरील विषयात जास्त लुडबूड केली तर अशी ट्रिटमेंट मिळते," असंही ते म्हणाले.काय म्हणाले होते पवार?"आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा माझा सल्ला राहिल, असं शरद पवार म्हणाले होते. तसेच इतके दिवस शेतकरी जर रस्त्यावर बसतायत तर त्याचा विचार करायला पाहीजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. हे खरं तर चांगलं नाही, त्यांनी नमूद केलं होतं. नरेंद्र तोमर यांचा अनादर करण्याचा हेतू नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढाकार घ्यायला हवा. कदाचित त्यातुन मार्ग निघण्याची शक्यता आहे, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. स्वातंत्र्यानंतर कधी असं घडलं नाही. सरकारने ही टोकाची भूमिका घेतल्यावरुन त्यांचे धोररण स्पष्ट होतंय. अन्नदाता जर रस्त्यावर बसतोय तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे, असंही शरद पवारांनी केंद्र सरकारला सांगितलं होतं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसICCआयसीसीBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकर