शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
2
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
3
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी,'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
4
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
5
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा उत्पादन परवाना रद्द; तामिळनाडू सरकारने कंपनी बंद करण्याचे दिले आदेश!
6
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
7
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
8
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
9
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...
10
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
11
DSP सिराज नंबर वन! झिम्बाब्वेच्या गड्याला टाकले मागे; पण इथं टॉप ५ मध्ये दिसत नाही बुमराहचं नाव
12
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
13
Shani Gochar 2025: शनि देवाची खास दिवाळी भेट: २० ऑक्टोबरपासून 'या' ८ राशींच्या तिजोरीत होणार धनवृद्धी!
14
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
15
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
16
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
17
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
18
Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक
19
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
20
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल

संजय राठोड-उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजप नेत्याचा टोला, म्हणाले, "बहुदा त्यांना कानात सांगितलं असावं मी तुला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 12:33 IST

बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राठोड यांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट

ठळक मुद्देबुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राठोड यांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेटदीड तासांच्या प्रतीक्षेनंतर राठोड यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी केली दोन मिनिटं चर्चा

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पूजाचे समोर आलेले नवे फोटो, ऑडिओ क्लिप यांच्यामुळे राठोड यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संजय राठोड हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचले होते. परंतु संजय राठोड यांची त्यांनी लगेच भेट घेतली नाही. त्यांना दीड तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. तसंच भेटीनंतर अवघ्या दोन मिनिटांचा त्यांना वेळ दिल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना आधी दीड तास ताटकळत ठेवलं आणि नंतर दोन मिनिटांची भेट दिली. बहुधा त्यांनी कानात सांगितलं असावं मी तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाही, मी तुझ्या पाठीशी आहे," असं म्हणत भातखळकर यांनी राठोड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर हल्लाबोल केला. राठोड यांनी घेतली होती भेटराठोड यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. परंतु त्यांना भेटीसाठी दीड तास ताटकळत राहावं लागलं. तसंच यानंतर त्यांनी केवळ दोनच मिनिटं राठोड यांच्याशी संवाद साधला. संजय राठोड वर्षा बंगल्यावर गेले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे संजय राठोड यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते, ऊर्जामंत्री नितीन राऊतदेखील वर्षा बंगल्यावर पोहोचले. संजय राठोड आणि त्यांच्यात काही चर्चा झाली का, याबद्दलची माहिती समजू शकलेली नाही. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाण