शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एकच वाक्य बोलले, पण अगदी सूचक बोलले; शरद पवारांच्या भेटीबद्दल शहा म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 15:46 IST

bjp leader amit shahs statement on meeting with sharad pawar and praful patel: शरद पवार आणि अमित शहांच्या गुप्त बैठकीची राजकीय वर्तुळात चर्चा; अमित शहांकडून भेटीच्या वृत्ताचं खंडन नाही

नवी दिल्ली: अँटिलिया प्रकरण, सचिन वाझे, मनसुख हिरेन प्रकरणांमुळे ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. भारतीय जनता पक्षानं गेल्या महिन्याभरापासून महाविकास आघाडी सरकारला सातत्यानं अडचणीत आलं आहे. यामुळे सरकारला काहीसं बॅकफूटवर जावं लागलं असताना दुसरीकडे गुजरातमध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये एका बड्या उद्योगपतीची भेट घेतली. हा उद्योगपती भाजपचा निकटवर्तीय मानला जातो. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (bjp leader amit shahs statement on meeting with sharad pawar and praful patel)शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?; भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळशरद पवार आणि अमित शहांच्या भेटीबद्दल मला कल्पना नसल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सावध प्रतिक्रिया दिली. तर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहांनी या भेटीबद्दल अतिशय सूचक विधान केलं आहे. काही गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात, असं शहा यांनी म्हटलं आहे. शरद पवारांसोबत भेट झाल्याच्या वृत्ताचं खंडन केलेलं नाही. त्यामुळेच शहांचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.मुख्यमंत्री शिवसेनेचा, त्यांना कोणी रोखलंय?; सेना-राष्ट्रवादीच्या वादात काँग्रेसची उडी

कुठे झाली भेट? कोण कोण उपस्थित?अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर २६ मार्चला रात्री ९.३० वाजता पटेल आणि बड्या उद्योगपतीची भेट झाली. विशेष म्हणजे ही भेट होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील गुजरातमध्येच होते. मात्र ते या बैठकीला उपस्थित होते का, हे समजू शकलेलं नाही. याशिवाय शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांची भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचं वृत्त दिव्य भास्कर या वृत्तपत्रानं दिलं आहे. या भेटीसाठी पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटनं शांतिग्राममधल्या गेस्टहाऊसला आले असल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.

काय आहे पार्श्वभूमी?अँटिलिया प्रकरणात सुरुवातीला सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे अडचणीत आले. त्यावेळी भाजपनं वाझे आणि शिवसेनेचे संबंध पुढे आणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. या प्रकरणात मुंबई पोलीस दलाचे आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. यानंतर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेंना १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर देशमुख अडचणीत आले आणि शिवसेनेवर असलेला टीकेचा रोख राष्ट्रवादीकडे वळला. पवार यांनी देशमुख यांचं समर्थन करत त्यांचा राजीनामा घेतला नसला, तरी यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पवार, पटेल आणि शहांची गुप्त बैठक महत्त्वाची मानली जात आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPraful Patelप्रफुल्ल पटेलAmit Shahअमित शहाsachin Vazeसचिन वाझे