शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षी आजच्या दिवशी: फडणवीसांच्या 'त्या' विधानाने दिली होती राजकारणाला कलाटणी

By प्रविण मरगळे | Updated: November 7, 2020 12:17 IST

Devendra Fadanvis, Shiv Sena BJP News: खरंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपा महायुती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी थेट लढत होती, राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपाचं सरकार येणार अशी खात्री असल्याने बरेच नेते आघाडीतून बाहेर पडले

ठळक मुद्देभाजपा आणि शिवसेना युती सरकार स्थापन करणार हे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट झालंपरंतु राज्यात वेगळीच राजकीय घडामोड पाहायला मिळाली, मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात बिनसलंठरल्याप्रमाणे सरकारमध्ये समसमान जागा वाटप झालं पाहिजे अशी आग्रही मागणी शिवसेनेने केली

मुंबई – राजकारणात कधीही कोणी मित्र नसतो किंवा कोणी कायमचा शत्रू नसतो असं म्हटलं जातं, हे प्रखरतेने जाणवलं जेव्हा राज्याच्या राजकारणात कट्टर शत्रू एकत्र येत सत्तास्थापन केली, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या सरकारला काही दिवसांत १ वर्ष पूर्ण होतील, इतकी वर्ष एकमेकांच्या समोर उभे असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना यांच्यात दिलजमाई झाली आहे, तिघांनी हातात हात घेत राज्यात सत्ता स्थापन केली.

खरंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपा महायुती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी थेट लढत होती, राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपाचं सरकार येणार अशी खात्री असल्याने बरेच नेते आघाडीतून बाहेर पडले आणि शिवसेना-भाजपात सहभागी झाले होते, विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि निकालही लागले. भाजपाला १०५, शिवसेना-५६, राष्ट्रवादी -५४ आणि काँग्रेस ४४ अशा प्रमुख पक्षांना जागा मिळाल्या. भाजपा आणि शिवसेना युती सरकार स्थापन करणार हे निकालावरुन स्पष्ट झालं.

परंतु राज्यात वेगळीच राजकीय घडामोड पाहायला मिळाली, मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात बिनसलं, मागील ५ वर्ष सत्तेत असूनही शिवसेनेने भाजपाविरोधात भूमिका घेतली होती, पण निवडणुकीवेळी या दोन्ही पक्षात समझोता झाला आणि युतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या गेल्या. निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली, ठरल्याप्रमाणे सरकारमध्ये समसमान जागा वाटप झालं पाहिजे अशी आग्रही मागणी शिवसेनेने केली, तर मुख्यमंत्री पद सोडून मंत्रिपदावर समान वाटप होईल असं भाजपाने सांगितले, यामुळेच युतीत वादाची ठिणगी पडली.

मुख्यमंत्रिपदावरून दिलेला शब्द पाळावा असं शिवसेना नेते म्हणू लागले, निवडणुकीपूर्वी भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, तेव्हा बंद दाराआड या दोन्ही नेत्यांमध्ये निवडणुकीबाबत वाटाघाटी झाली होती, या बैठकीत जे ठरलं आहे तेच भाजपाने पाळावं अशी मागणी शिवसेनेने केली, पण अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद सोडण्यास भाजपाने नकार दिला. तेव्हा काळजी वाहू मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसाठी दिवाळी स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं, यात अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद देण्याचा कुठलाही शब्द शिवसेनेला दिलेला नाही, या देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्यानं राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली होती.

गेल्या वर्षी आजच्याच दिवशी वर्षावर देवेंद्र फडणवीसांनी स्नेहभोजनावेळी ही भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपा वाद विकोपाला गेला, शिवसेनेने भाजपाशी चर्चा न करण्याचं ठरवलं आणि थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणी सुरू केली, त्यानंतर भाजपाने रातोरात अजित पवारांना हाताशी धरत पहाटे सत्तास्थापनेचा दावा केला, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली, राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली, ७० तासांनंतर अजित पवारांच्या राजीनाम्याने सरकार कोसळलं, त्यानंतर पुन्हा शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन करत मुख्यमंत्रिपद पटकावलं. कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी ते विधान केले नसते तर आज राज्यातील चित्र वेगळ पाहायला मिळालं असतं.     

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्रीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस