शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आले: अस्लम शेख

By मोरेश्वर येरम | Updated: January 17, 2021 16:59 IST

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा आज मेळावा आयोजित करण्यात आला.

ठळक मुद्देमुंबईच्या पालकमंत्र्यांची भाजपवर सडकून टीकाभाजपवाले शिवसेनेला संपवायला निघाले होते, असं अस्लम शेख म्हणालेभाजप पक्ष चुकीच्या मार्गाने वर आला असल्याचा केला आरोप

"खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंगकरुन भाजप पक्ष वर आला आहे", असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे आमदार आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे. ते नवी मुंबईत बोलत होते. 

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा आज मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात संबोधित करताना अस्लम शेख यांनी भाजपचा सडकून समाचार घेतला. 

"खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅप करुन भाजप पक्ष वर आला आहे. भाजप चांगल्या लोकांच्या मागे ईडी लावत आहे. भाजप शिवसेनेसोबत इतकी वर्ष होती. ज्यांचं बोट धरुन तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात त्याच शिवसेनेला हे संपवायला निघाले होते. आता शिवसेना चांगलं काम करू लागली तर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा काढला", अशी टीका अस्लम शेख यांनी केली. 

भाजपने केवळ खायचं काम केलंनवी मुंबईतील विकास कामांवरुनही अस्लम शेख यांनी भाजपवर टीका केली. "गेल्या दहा-बारा वर्षात नवी मुंबईकरांसाठी काहीतरी करायची गरज होती. पण भाजपने केवळ खायचं काम केलं. आम्ही आश्वासन देतो. इथल्या भूमिपुत्रांसाठी मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांसाठी नक्की निर्णय घेऊ. नवी मुंबईसाठी कसं बंदर विकसीत केलं जाईल यावर कॅबिनेट बैठकीत लवकरच निर्णय घेऊ", असं अस्लम शेख म्हणाले.  

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबईcongressकाँग्रेसBJPभाजपा