रातोरात राष्ट्रवादीचा सदस्य फोडून भाजपानं सत्ता मिळवली; राज्यात पुन्हा ‘पहाटेचा शपथविधी’ घडला

By प्रविण मरगळे | Published: February 17, 2021 02:46 PM2021-02-17T14:46:47+5:302021-02-17T14:48:57+5:30

NCP-BJP Politics in Ahmadnagar: रातोरात भाजपाने राष्ट्रवादीचा एक सदस्य फोडून त्याला भाजपाच्या बाजूने वळवले

BJP came to power by ousting a NCP member overnight in Ahmadnagar Loni Haveli Grampanchayat | रातोरात राष्ट्रवादीचा सदस्य फोडून भाजपानं सत्ता मिळवली; राज्यात पुन्हा ‘पहाटेचा शपथविधी’ घडला

रातोरात राष्ट्रवादीचा सदस्य फोडून भाजपानं सत्ता मिळवली; राज्यात पुन्हा ‘पहाटेचा शपथविधी’ घडला

Next
ठळक मुद्देउपसरपंचपदाची ऑफर देऊन भाजपाने त्याला मध्यरात्रीच महादेवाच्या मंदिरात घेऊन शपथविधी सोहळा पार पाडला.या शपथविधी सोहाळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने हा भांडाफोड झालाराज्यातील राजकारणात पहाटेचा शपथविधी गाजला तसाच रात्रीचा शपथविधी सोहळा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला

अहमदनगर – मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपाचं बिनसलं, शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला, यातच पहाटे अजित पवारांनासोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी सत्ता स्थापन केली, देवेंद्र फडणवीसांनी स्थापन केलेली ही सत्ता ७२ तासांपेक्षा जास्त चालली नाही परंतु राज्यात तो पहाटेचा शपथविधी प्रचंड गाजला, याच पहाटेच्या शपथविधीची पुनरावृत्ती करून देणारी घटना राज्यात पुन्हा घडली आहे. (BJP came to power in loni haveli grampanchayat by defeating one NCP member)

अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात लोणी हवेली येथे सरपंचपदाच्या निवडणुकीत असा किस्सा पुन्हा घडला. रातोरात भाजपाने राष्ट्रवादीचा एक सदस्य फोडून त्याला भाजपाच्या बाजूने वळवले, उपसरपंचपदाची ऑफर देऊन भाजपाने त्याला मध्यरात्रीच महादेवाच्या मंदिरात घेऊन शपथविधी सोहळा पार पाडला. मात्र पुन्हा राष्ट्रवादीने या सदस्याची घरवापसी करत भाजपाकडील सरपंचपद औटघटकेचे ठरवले.

या शपथविधी सोहाळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने हा भांडाफोड झाला. राज्यातील राजकारणात पहाटेचा शपथविधी गाजला तसाच रात्रीचा शपथविधी सोहळा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला. पारनेर तालुक्यातील लोणी हवेली गावात बिनविरोध निवडणुका व्हाव्यात यासाठी आमदार निलेश लंके यांनी आवाहन केले होते, परंतु भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, शत्रुघ्न नवघणे यांनी याला विरोध केला. त्यानंतर निवडणुकीत राष्ट्रवादीचे अशोक दुधाडे, जान्हवी बाजीराव कोल्हे, शिवाजी थोरे, सीमा कोल्हे, अमोल दुधाडे असे पाच जण निवडून आले. तर भाजपचे शत्रुघ्न नवघणे, संजीवनी दुधाडे यांच्यासह अन्य दोन असे चार सदस्य निवडून आले. ग्रामपंचायतीत ५ आणि ४ असं बलाबल झालं.

सरपंचपदासाठी भाजपाने राष्ट्रवादीचा सदस्य रातोरात फोडला आणि त्याला उपसरपंचपद देऊ केले. या सदस्याला सोबत घेऊन भाजपाने महादेव मंदिरात मध्यरात्रीच शपथविधी सोहळा उरकून घेतला. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या त्या सदस्याला पाच वर्ष एकत्र राहण्याचे सांगून महादेवाच्या पिडींवर हात ठेवून शपथ घेण्यास सांगितली. सकाळी या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर गावात खळबळ माजली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना ही माहिती समजताना त्यांनी थेट बंडखोर सदस्याचे घर गाठले आणि त्याची समजूत काढून पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी केली त्यामुळे काही तासांसाठी सरपंचपद भाजपाला मिळाले. त्यानंतर पुन्हा गावात सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक झाली. यात ५-४ च्या मताधिक्याने राष्ट्रवादीच्या जान्हवी दुधाडे या सरपंचपदी, तर उपसरपंचपदी अमोल दुधाडे निवडून आले. रात्रीच शपथ घेतलेल्या भाजपच्या संजीवनी दुधाडे, शत्रुघ्न नवघणे यांना पराभव पत्करावा लागला.

Web Title: BJP came to power by ousting a NCP member overnight in Ahmadnagar Loni Haveli Grampanchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.