शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

"कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो"; भाजपाचं महापौरांना जोरदार प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 15:54 IST

BJP Atul Bhatkhalkar Slams Mayor Kishori Pednekar : 'भाजपाला भौ-भौ करत राहू दे. ते अगदी दूध के धुले आहेत' असं म्हणत टीकास्त्र सोडलं. पेडणेकर यांच्या टीकेला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे.  

मुंबई - पश्चिम उपनगरातील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात एक चार मजली इमारत बुधवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी काही मुलांसह अनेक लोक या इमारतीमध्ये होते. इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवरुन भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्याबाबत पत्रकारांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रश्न विचारला होता. त्यावर 'भाजपाला भौ-भौ करत राहू दे. ते अगदी दूध के धुले आहेत' असं म्हणत टीकास्त्र सोडलं. पेडणेकर यांच्या टीकेला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे.  

भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्यावर पलटवार केला आहे. "कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो" अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "महापौर किशोरी पेडणेकर यांचे हे वक्तव्य त्यांचे संस्कार आणि पक्षाची संस्कृती दाखवणारे आहे. महत्त्वाचे म्हणजे कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो हे लक्षात असू दे" असं भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

मालाडमधील मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण  जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक लोकांच्या मदतीने इमारतीच्या ढिगाऱ्याखली अडकलेल्या 15 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले. तसेच, इमारतही खबरदारी म्हणून रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात येत असून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे.

मुंबई उपनगरातील मालाड पश्चिम परिसरातील मालवणी भागात इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 8 लहान मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले. त्यांच्यावर कांदिवली परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपचार घेत असलेल्या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका इकबाल सिंह चहल, उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, महापालिकेचे सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त विश्वास शंकरवार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Kishori Pednekarकिशोरी पेडणेकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरBuilding Collapseइमारत दुर्घटनाPoliticsराजकारणMumbaiमुंबई