शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

“जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?”; ‘त्या’ प्रकरणावरुन भाजपचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 16:56 IST

धर्मांतर करणाऱ्या रॅकेटप्रकरणी बीडमधून तिघांना अटक करण्यात आली असून, यावरून आता भाजपने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई: उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या धर्मांतर करणाऱ्या रॅकेटवर कारवाई झाल्यानंतर आता याच्या तपासातून रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएस पथकाने सोमवारी बीड जिल्ह्यातील मन्नू यादव, अब्दुल इरफान शेख आणि राहुल भोला यांना अटक केली. यावरून आता भाजपने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. (bjp atul bhatkhalkar criticized cm uddhav thackeray over religion conversion racket)

उत्तर प्रदेशात धर्मांतरण रॅकेटसाठी ७ पद्धतीचे कोड वापरण्यात येत होते. हे सर्व कोड डिकोड करून त्याचा अर्थ उलगडला आहे. देशभरात केल्या जात असलेल्या धर्मांतर रॅकेटचा हे दोघे भाग असल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला होता. या रॅकेटचे धागेदोरे राज्यातील बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर; पाहा, नियमावली

जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?

उत्तर प्रदेशातील धर्मांतराच्या षडयंत्रात सहभागी असल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी बीडच्या एका युवकाला अटक केली आहे. त्याचे लागेबांधे निश्चितच महाराष्ट्रात खोलवर पसरलेले असणार. ठाकरे सरकारने ही पाळेमुळे खणून काढावीत. जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. 

सुटकेसाठी संघटना सरसावल्या

उमर गौतम आणि जहाँगीर यांच्या अटकेनंतर त्यांच्या सुटकेसाठी नवी दिल्लीतील स्टूडेंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया यांनी पुढे येऊन त्यांना सोडण्याची मागणी केली आहे. राज्य सरकार त्यांच्या राजकीय फायद्यासाठी समाजात द्वेष पसरवण्याचं काम करतंय त्यात मिडियाचा एक मोठा गटही काम करतोय असा आरोप या संघटनेने केला.

“अनिल देशमुखांना ईडी कार्यालयात जायचं म्हटलं की वय, आजार आठवायला लागलं”

दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएसने मूळ दिल्लीतील रहिवाशी असणाऱ्या मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम यांना अटक केली होती. मूकबधिर मुले आणि महिलांचे धर्मांतर केल्यांच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग असून, १ हजारांपेक्षा जास्त लोकांचे त्यांनी धर्मांतर केले असल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणAtul Bhatkalkarअतुल भातखळकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना