शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Election Result Live: रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरु राहणार; NDA ला धाकधूक अन् महाआघाडीला आशा कायम

By प्रविण मरगळे | Updated: November 10, 2020 14:37 IST

Bihar Election Result Live, BJP, RJD, JDU, Congress News: मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५  मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती

ठळक मुद्देसुमारे ४.१० कोटी लोकांनी मतदान केले आहे. आतापर्यंत १ कोटींहून अधिक मतमोजणी झाली आहेमतमोजणी १९ ते ५१ फेऱ्यात होऊ शकतात, हे मतदानाच्या मोजणीवर अवलंबून असेलकाही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी १९ फेऱ्यांमध्ये संपू शकते

नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत, मात्र अद्यापही निकालांच्या आकड्यात काहीही होऊ शकतं अशी स्थिती आहे. बिहारमध्ये एनडीएला १३० जागांची आघाडी मिळाली आहे तर महाआघाडीला १०२ जागांवर आघाडी आहे. यात भाजपाला सर्वाधिक ७४ जागांवर आघाडी मिळाली आहे तर त्यापाठोपाठ ६५ जागांवर तेजस्वी यादव यांच्या राजद पक्षाला आघाडी आहे.

याचवेळी बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, यंदा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मतांची मोजणी झाली आहे. यावेळी मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५  मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती पण यावेळी ५८ ठिकाणी मतदान केंद्रे होती असं डीईसी चंद्रभूषण यांनी सांगितले.

तर यावेळी सुमारे ४.१० कोटी लोकांनी मतदान केले आहे. आतापर्यंत १ कोटींहून अधिक मतमोजणी झाली आहे. यापूर्वी २५-२६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत होती, यावेळी किमान ३५ फेऱ्या मतमोजणी होण्याची शक्यता आहे. यामुळे रात्री उशीरापर्यंत मतमोजणी चालू राहू शकते असं बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एचआर श्रीनिवास यांनी सांगितले आहे.

निवडणूक आयोगाचा अंदाज आहे की, मतमोजणी १९ ते ५१ फेऱ्यात होऊ शकतात, हे मतदानाच्या मोजणीवर अवलंबून असेल. आयोगाने अंदाजे ३५ फेऱ्यांचा अंदाज लावला आहे. काही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी १९ फेऱ्यांमध्ये संपू शकते तर काहींमध्ये ५१ फेऱ्यांपर्यंत मतमोजणी जाऊ शकते. तसेच काँग्रेसने केलेल्या आरोपावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. आयोगाने पुन्हा एकदा ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर भाष्य केले आणि म्हटले की, ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यात छेडछाड करता येणार नाही असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला.

काँग्रेसने घेतली ईव्हीएमवर शंका

महाविकास आघाडी पिछाडीवर पडत असल्याचा कल समोर आल्यानंतर काँग्रेस नेते उदित राज यांनी ट्विट करत ईव्हीएमवर शंका घेतली ते म्हणाले. जर मंगळ ग्रह आणि चंद्रावर जाणाऱ्या उपग्रहाची दिशा पृथ्वीवरून नियंत्रित करता येत असेल तर ईव्हीएम हॅक का करता येणार नाही? अमेरिकेत जर ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान झालं असतं तर ट्रम्प पराभूत झाले असते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बिहारमधील मतमोजणीच्या सध्याच्या कलांमध्ये एनडीए १३० जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी ही १०० ते १०५ जागांवर आघाडीवर आहे. पक्षवार विचार केल्यास निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपा ७२, जनता दल युनायटेड ४८, राष्ट्रीय जनता दल ६५, काँग्रेस २१ आणि लोकजनशक्ती पार्टी २ जागांवर आघाडीवर आहे. तर डावे पक्ष १९ जागांवर आघाडीवर आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग