शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तेजस्वी! उद्या सकाळपर्यंतच काय तो जल्लोष साजरा कर; भाजपाने दिला इशारा

By हेमंत बावकर | Updated: November 9, 2020 17:33 IST

Bihar Election 2020: बहुतांश एक्झिट पोलमध्ये नितीशकुमार यांच्या महायुतीला फटका बसणार असल्याचे दाखविण्यात आले आहे. रामविलास पासवान यांच्या पक्षाने जदयूच्या 25 जागा पाडल्याच्या अंदाजामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे.

Bihar Election 2020 : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. या निवडणुकीत नितीशकुमार आणि भाजपाची प्रतिष्ठा प्राणपणाला लागलेली असून लालू प्रसाद यांच्या पक्षाला झुकते माप एक्झिट पोलनी दिलेले आहे. यामुळे राजदप्रणित काँग्रेस आघाडीमध्ये उत्साहाचे वातावरण असून पटनामध्ये ठिकठिकाणी राजद समर्थकांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. यातच आज राजदचे नेते आणि लालू यांचे पूत्र तेजस्वी यादव यांचा वाढदिवस असल्याने भाजपाने हाच धागा पकडून शरसंधान साधले आहे. 

बहुतांश एक्झिट पोलमध्ये नितीशकुमार यांच्या महायुतीला फटका बसणार असल्याचे दाखविण्यात आले आहे. रामविलास पासवान यांच्या पक्षाने जदयूच्या 25 जागा पाडल्याच्या अंदाजामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे आमदारांची फोडाफोड होण्याच्या शक्यतेने काँग्रेसने कालपासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सोनिया गांधी यांचे खास सुरजेवाला आणि आणखी एक नेता पटनामध्ये तएकीकळ ठोकून आहेत. 

एकीकडे राजद समर्थक उत्साहात असताना भाजपाने तेजस्वी यादव यांना उद्या सकाळपर्यंतच काय तो आनंद साजरा करण्याचा इशारा दिला आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी सोमवारी सांगितले की, 10 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंतच सारे चित्र स्पष्ट होईल. यामध्ये एनडीए बिहारमध्ये पूर्ण बहुमताने सरकार बनविणार असल्याचे दिसेल, तजस्वी यांनी उद्या सकाळपर्यंतच आनंद साजरा करावा, असे म्हटले आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यातील मतदानाने एक गोष्ट पक्की केली आहे की, जनतेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याप्रती उत्साह दिसून आला. यामुळे मोठ्या संख्येने मतदारांनी एनडीएला मतदान केले आहे, असे हुसेन म्हणाले. 

तेजस्वी यादव शरद पवारांना हरवणार...बहुतांश एक्झिट पोलनुसार तेजस्वी यादव यांच्याबाजूने बिहारच्या लोकांनी कौल दिला असून जर असं झालं तर पुढील मुख्यमंत्रिपदाची माळ तेजस्वी यादव यांच्या गळ्यात पडेल. आणि वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी तेजस्वी यांच्यासाठी ते सर्वात मोठं गिफ्ट असेल. आज तेजस्वी यादव यांचा वाढदिवस आहे तर उद्या(मंगळवारी) बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होणार आहे. या निकालात तेजस्वी यादव हे आणखी एक विक्रम साध्य करू शकतात.बिहारमध्ये सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांना सन्मान मिळू शकतो. यापूर्वी सतीश प्रसाद सिंह हे वयाच्या ३२ व्या वर्षी १९६८ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री राहिले होते. तेजस्वी यादव हे ३१ वर्षांचे आहेत. १ जानेवारी १९३६ मध्ये जन्म घेतलेल्या सतीश प्रसाद यांचा कार्यकाळ अवघ्या ५ दिवसांचा होता. एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर तेजस्वी यादव बिहारमधील सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री होतील पण त्यासाठी मंगळवारच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे. शरद पवार हे वयाच्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते.

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवSharad Pawarशरद पवारNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपा