शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

Bihar Election 2020: ही माझी अखेरची निवडणूक; प्रचारसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांची घोषणा

By कुणाल गवाणकर | Updated: November 5, 2020 17:00 IST

Bihar Election 2020: बिहारमध्ये ७ तारखेला तिसऱ्या टप्प्यातलं मतदान; पूर्णियात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पाटणा: बिहारमधील निवडणूक अखेरच्या टप्प्यात आली आहे. ७ नोव्हेंबरला तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान असून १० नोव्हेंबरला निकाल आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सत्ता कायम राखण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर मित्रपक्ष भाजपनंही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांच्या सभांचं आयोजन करून बिहार पिंजून काढला आहे. संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्षासमोर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसनं आव्हान उभं केलं आहे.निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. पूर्णियामध्ये एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी घोषणा केली. ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे माझ्या पक्षाला विजयी करा. ज्याचा शेवट गोड, ते सगळंच गोड, असं कुमार म्हणाले. 'आज निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे. परवा मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे,' असं कुमार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटलं. आमच्या उमेदवाराला विजयी कराल ना, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थितांना विचारला. नितीश कुमार यांच्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक आव्हानात्मक आहे. भाजपसोबत निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या संयुक्त जनता दलासमोर राजद आणि काँग्रेसनं तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यातच केंद्रात एनडीएचा घटकपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षानं बिहारमध्ये एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकजनशक्ती पक्ष अगदी उघडपणे कुमार यांच्याविरोधात उतरला आहे. त्यांनी संयुक्त जनता पक्षाच्या उमेदवारांविरोधात सगळ्याच जागांवर उमेदवार दिले आहेत. मात्र भाजपच्या जागांवर उमेदवार दिलेले नाहीत. त्यामुळे जनता दलाच्या अडचणी वाढल्या आहेत.एका बाजूला चिराग पासवान सातत्यानं नितीश कुमार यांना लक्ष्य करत आहेत. आज पंतप्रधान मोदींसमोर नतमस्तक होणारे नितीश निवडणूक निकालानंतर तेजस्वी यादवांसमोर नतमस्तक होतील. ते खुर्ची टिकवण्यासाठी राष्ट्रीय जनता दलासोबत जातील, अशा शब्दांत पासवान मुख्यमंत्र्यांना लक्ष करत आहेत. तर नितीश कुमार यांचं वय वाढलं आहे. त्यामुळे त्यांना रिटायर करा, असं आवाहन तेजस्वी यादव बिहारी जनतेला करत आहेत.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलTejashwi Yadavतेजस्वी यादवNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस