शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Bihar Assembly Election Results: नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रिपद जाणार?; भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

By कुणाल गवाणकर | Updated: November 10, 2020 15:22 IST

Bihar Assembly Election Results: बिहारमध्ये भाजपची सर्वात मोठा पक्ष होण्याकडे वाटचाल सुरू

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. सध्या भारतीय जनता पक्ष राज्यातला क्रमांक एकचा पक्ष होण्याकडे वाटचाल करत आहे. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) मोठा फटका बसला आहे. जेडीयूला सध्या ५० पेक्षा कमी जागांवर आघाडी आहे. गेल्या निवडणुकीत जेडीयूनं ७१ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा त्यांना मोठं नुकसान होताना दिसत आहे. भाजपनं जास्त जागा जिंकल्यानं मुख्यमंत्रिपद कोणाला याचीही चर्चा जोर धरू लागली आहे. मोदींच्या 'हनुमाना'चा मित्रपक्षाला फटका; भाजपमुळे जेडीयूला अर्धा डझनचा झटका?भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला निवडणुकीत भाजपाने पुढे केले होते, संध्याकाळ पर्यंत बिहारमध्ये सरकार स्थापन करणे आणि नेतृत्वाबाबत निर्णय केला जाईल. मात्र त्यांच्या या विधानावरून भाजपा राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल फेरविचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमारांना दिलेले आश्वासन भाजपा पाळणार का? हे पाहणे गरजेचे आहे.भाजपच्या राजकारणानं मुख्यमंत्री नितीश कुमार घायाळ; मित्रपक्षावरच भाजपचा बाण?भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, असं जायसवाल म्हणाले. आम्ही निवडणूक निकालाचा अभ्यास करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नितीश कुमारच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल प्रश्नच निर्माण होत नाही, असं जायसवाल यांनी स्पष्ट केलं आहे.बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढेराज्यात भाजप मोठा पक्ष ठरल्यानं पक्षातून मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला जाऊ शकतो. आता भाजप मोठा भाऊ ठरल्यानं राज्यातील नेते मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक पवित्रा घेतला जाऊ शकतात. त्यामुळेच येत्या काही दिवसांत बिहारमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नितीश कुमार जरी मुख्यमंत्री झाले, तरीही त्यांच्या सरकारवर भाजपचा वरचष्मा राहील, अशी दाट शक्यता आहे. नितीश यांच्या सरकारमध्ये भाजप अनेक महत्त्वाची खाती पदरात पाडून घेऊ शकतो.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा