शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Bihar Assembly Election Results: बिहारमधील भाजपचं यश म्हणजे फडणवीसांचा विजय? शरद पवारांचा मिश्किल टोला; म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Published: November 10, 2020 6:35 PM

Bihar Assembly Election Results: बिहारच्या निवडणूक निकालावर बोलताना शरद पवारांचा चिमटा

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाला बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचं महागठबंधन सत्ताधारी एनडीएला कडवी टक्कर देत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला मागे पडलेल्या भाजपनं नंतर जोरदार मुसंडी मारली. गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला भाजप यंदा थेट पहिल्या क्रमांकासाठी राजदशी स्पर्धा करताना दिसत आहे. याचं श्रेय भाजप नेते प्रसाद लाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक टोला लगावला आहे.'देवेंद्र फडणवीसांनी नक्कीच इथं बसून बिहारची सुत्रं हलवली असतील'बिहारमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारली आहे. गेल्या निवडणुकीत ५३ जागा जिंकणारा भाजप सध्या ७२ जागांवर पुढे आहे. विशेष म्हणजे भाजपनं घेतलेल्या भरारीमुळे जेडीयू मागे गेला आहे. त्यामुळे भाजप आघाडीमधील मोठा भाऊ ठरला आहे. बिहारमधील निवडणुकीचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे भाजपचं यश म्हणजे फडणवीसांचा विजय असल्याचं भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले.बिहारमध्ये अपेक्षित निकाल लागला नाही, शरद पवारांनी सांगितलं कारणराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बिहारमधील भाजपच्या कामगिरीतील फडणवीस यांच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 'हा चमत्कार आमच्या डोक्यात प्रकाश पाडणारा होता; फार चांगली माहिती सांगितली तुम्ही,' अशी खोचक प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. यावेळी त्यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं. तेजस्वी यांनी अतिशय चांगली लढत दिली. त्यांनी भाजप, जदयू विरोधात चांगली कामगिरी केली, अशी स्तुतीसुमनं पवार यांनी उधळली. बिहारमध्येही ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ होऊ शकतं; शिवसेना मंत्र्याचा मोठा दावाकाय म्हणाले होते प्रसाद लाड?बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएचा धुव्वा उडाल्याचं चित्र एक्झिट पोलमध्ये दाखवलं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात वातावरण असल्याचं दाखवलं. मात्र, बिहारमधील जनतेने भाजपवर, पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला” अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी एका मराठी वृत्त वहिनीला दिलेली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी उचलली. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचंही हे यश आणि विजय आहे. या निवडणुकीत एनडीए १३० च्या वर जाईल आणि महागठबंधन १०० च्या खाली येईल, असा विश्वासही यावेळी प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा