शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
4
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
5
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
6
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
7
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
8
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
9
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
10
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
11
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
12
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
13
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
14
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
15
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
16
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
17
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
18
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
19
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
20
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस

Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये तेजस्वी लाट? पोस्टल बॅलेटच्या मोजणीत महाआघाडीला मोठी आघाडी

By बाळकृष्ण परब | Published: November 10, 2020 8:48 AM

Bihar Assembly Election Result News: सुरुवातीच्या कलांमध्ये बिहारमधील विविध भागात राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआआघाडीच्या उमेदवारांना आघाडी मिळताना दिसत आहे

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मोजणी सुरू आहे. दरम्यान, पोस्टल बॅलेटच्या मोजणीमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने मोठी आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये बिहारमधील विविध भागात राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआआघाडीच्या उमेदवारांना आघाडी मिळताना दिसत आहे.सध्याच्या कलांनुसार महाआघाडीचे उमेदवार १०० जागांवर आघाडीवर आहे. तर एनडीएचे उमेदवार ५९ जागांवर आघाडीवर आहेत. स्वबळावर निवडणूक लढवत असलेल्या लोकजनशक्ती पक्षाला एका जागेवर आघाडी मिळाली आहे.पराभूत झाल्यास नितीशकुमारांवर खापर; विजयी झाल्यास मोदींना श्रेय बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची लोकप्रियता कमी झाल्याने राज्यातील विधानसभा निवडणुकीत एनडीएला विजय मिळाल्यास त्याचे श्रेयपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांना जाईल. एनडीएचा पराभव झाला तर त्याचे खापर नितीशकुमारांच्या डोक्यावर फुटेल, अशी रणनीती भाजपची  आहे.बिहारमध्ये मंगळवारी मतमोजणी आहे. राजदचे तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला मोठे यश मिळेल,  असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत.  सेंटर फॉर डेव्हलपिंग सोसायटीजच्या पाहणीनुसार, २०१५ निवडणुकांनंतर नितीशकुमार यांच्याबद्दल ८० टक्के लोकांचे अनुकूल मत होते. आता हे प्रमाण ५२ टक्क्यांपर्यंत कमी झाले.भाजपशासित राज्यांनाही  बसला होता फटकानितीशकुमारांच्या राजवटीत २०१९-२० या आर्थिक वर्षात बिहारच्या ठोकळ उत्पन्नाच्या  ५० टक्के रक्कम समाजकल्याण योजनांवर खर्च करण्यात येत होती. त्याचे लाभ मिळत असूनही जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांकडे आकर्षित झाल्याचे दिसून आले. याआधीच्या विशेषत: भाजपशासित राज्यांतील विधानसभा निवडणुकांत तेथील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज जनतेने शिवराजसिंह चौहान, रमणसिंह यांना सत्तेवरून दूर केले होते. लोकप्रियता घटलेल्या नितीशकुमारांवरही हीच पाळी येणार,  अशी चर्चा आहे.

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकTejashwi Yadavतेजस्वी यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBJPभाजपा