शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

Bihar Assembly Election Result : बिहार निकाल! ...अन् तेजस्वी यादवांच्या घरासमोर मासे घेऊन आले कार्यकर्ते

By हेमंत बावकर | Updated: November 10, 2020 13:58 IST

Bihar Election Result 2020: एक्झिट पोलनी एनडीए आणि राजद आघाडीमध्ये टफ फाईट होण्याची शक्यता वर्तविली होती. तर काही पोलमध्ये राजद आघाडी बहुमतात येईल असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्ष निकाल वेगळे दिसू लागल्याने ट्विटरवर ईव्हीएमविरोधात चर्चा सुरु झाली होती. 

बिहार विधानसभेची मतमोजणी आता अत्यंत चुरशीच्या वळणावर येऊन ठेपली आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष बनण्याची चिन्हे दिसू लागली असून नितिशकुमार यांना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न सोडावे लागणार असल्याचे काही राजकीय पंडितांचा कयास आहे. अशातच सकाळपर्यंत तेजस्वी यादव यांच्या यांच्या मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न राजद समर्थक पाहत होते. ते मात्र भंगताना दिसत आहे.

मतमोजनीच्या सुरुवातीला तेजस्वी यादव यांच्या राजद महाआघाडीला मताधिक्य मिळत होते. यामुळे एक्झिट पोल आल्य़ापासून राजदच्या कार्यकर्ते जे आनंदात होते, ते काही कमी होताना दिसत नव्हते. एनडीए मागे पडल्याचे समजताच राजदचे काही हौशी कार्यकर्ते मोठमोठे मासे घेऊन थेट तेजस्वी यादवांच्या निवासस्थानासमोर हजर झाले. काही समर्थकांच्या हातात तेजस्वी यादवांचे फोटो देखील होते. वृत्तसंस्था एएनआयने हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये काही समर्थक दोन हातांवर मोठमोठे मासे घेऊन उभे आहेत. तर काही समर्थक हातामध्ये तेजस्वींचा फोटो घेऊन उभे होते. 

मात्र, थोड्याच वेळात त्यांचा हा उत्साह मावळला. कारण एनडीएने आघाडी मिळवत जवळपास 130 जागांवर मताधिक्य मिळविले होते. तर राजद आघाडीला 100 जागांवर मताधिक्य दिसत होते. सध्या मतमोजणी सुरु असून 45 जागा अशा आहेत ज्यावर दोन उमेदवारांमध्ये केवळ 100 पेक्षाही कमी मतांचा फरक आहे. यामुळे बिहार निवडणुकीत चुरस वाढली आहे. 

नितिशकुमार गेल्या 15 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी लालू प्रसाद यांच्या रादज, काँग्रेससोबत निवडणूक लढविली होती. काही महिने एकत्र सत्ता उपभोगल्यानंतर नितिशकुमार यांनी भाजपसोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली होती. 

एक्झिट पोलनी एनडीए आणि राजद आघाडीमध्ये टफ फाईट होण्याची शक्यता वर्तविली होती. तर काही पोलमध्ये राजद आघाडी बहुमतात येईल असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्ष निकाल वेगळे दिसू लागल्याने ट्विटरवर ईव्हीएमविरोधात चर्चा सुरु झाली होती. 

नितिशकुमार यांचे सहा मंत्री पिछाडीवर आहेत. हिन्दुस्तानी अवाम मोर्चा-सेक्युलर (हम) चे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी हे इमामगंज मतदारसंघातून 2000 मतांनी पिछाडीवर आहेत. 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाfishermanमच्छीमार