शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Assembly Election 2020: रालोआपासून दूर गेलेल्या चिराग यांच्या पोस्टरवर मोदींचे छायाचित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 06:52 IST

Bihar Assembly Election 2020: ‘हम बिहार देखेंगे, मोदीजी हिंदुस्थान’ : बिहारमध्ये ‘अजब प्रेम की, गजब कहानी’

- एस.पी. सिन्हा पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत ‘अजब प्रेम की, गजब कहानी’ पाहायला मिळत आहे. जदयु आणि भाजप यांच्यापासून दूर होत लोजपा मैदानात उतरली आहे; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमाचा मोह काही केल्या कमी होताना दिसत नाही. लोजपा सातत्याने पंतप्रधान मोदी यांच्या नावाचा वापर करताना दिसत आहे.चिराग पासवान हे बिहारमध्ये रालोआपासून वेगळे झाल्यानंतरही भाजपसोबत सरकार बनवू पाहत आहेत. चिराग पासवान हे स्वत:ला भाजपच्या जवळचे असल्याचे सांगतात. मात्र, भाजपने स्पष्ट केले आहे की, रालोआशिवाय कोणीही पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र वापरू नये; अन्यथा त्यांच्याविरुद्ध रीतसर तक्रार दिली जाईल.लोजपाने बुधवारीच २९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात भाजपच्या चार मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान म्हणतात की, पंतप्रधान मोदी देशाचे नेते आहेत आणि आमचेही नेते आहेत.हम बिहार देखेंगे, मोदीजी हिंदुस्थान देखेंगेसोशल मीडियावर एक पोस्टर सध्या पाहायला मिळत आहे. ‘हम बिहार देखेंगे, मोदीजी हिंदुस्थान देखेंगे’, अशी घोषणा व्हायरल होत आहे. यावर चिराग पासवान आणि रामविलास पासवान यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र आहे. अर्थात, भाजपकडून लोजपाला स्पष्ट सांगण्यात आले आहे की, त्यांनी मोदी यांचे छायाचित्र वापरू नये.नोकरीही गेली अन् तिकीटही नाहीअभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून वादास सुरुवात झाल्यापासून बिहार पोलिसांचे तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचे नाव बरेच चर्चेत होते.निवडणूक जवळ येताच गुप्तेश्वर पांडे यांनी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देत थेट राजकारणात उडी घेतली होती. मात्र, पांडे यांना निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही. नोकरीही गेली अन् तिकीटही मिळाले नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे.निराश झालेल्या चाहत्यांना गुप्तेश्वर पांडे यांनी फेसबुकवरून संयम बाळगण्याचे आवाहन केलेय. गुप्तेश्वर पांडे यांना वाल्मीकीनगर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेड