शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
7
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
8
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
9
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
10
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
11
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
12
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
13
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
14
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
15
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
16
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
17
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
18
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

मोठी बातमी! एकनाथ खडसेंना मंत्रिपद नाही?; राष्ट्रवादी प्रवेशामुळे महाविकास आघाडीत धुसफूस

By प्रविण मरगळे | Updated: October 23, 2020 12:23 IST

NCP Eknath Khadse News: एकनाथ खडसे यांचे शिवसेनेसोबत चांगले संबंध नाहीत, त्यामुळे खडसेंसाठी ग्रामीण भागाशी कनेक्ट असलेले कृषी खातं का सोडायचं? असा प्रश्न शिवसेनेत निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देएकनाथ खडसे यांचे शिवसेनेसोबत चांगले संबंध नाहीत, त्यामुळे खडसेंसाठी ग्रामीण भागाशी कनेक्ट असलेले कृषी खातं का सोडायचं?जर शिवसेनेने कृषी खातं सोडलं नाही तर गृहनिर्माण खाते एकनाथ खडसेंना दिले जाईल असंही सांगितलं जात आहे.जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खाते सोडण्यास अनुकूल नाहीत, परंतु शरद पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई – भाजपाला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसेराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, मात्र खडसेंना पुनर्वसन करणार कसं? असा प्रश्न राष्ट्रवादीसमोर असणार आहे. एकनाथ खडसेंना कृषिमंत्री देण्यात येईल असं सांगण्यात येत होतं, परंतु शिवसेना कृषी खाते सोडण्यास उत्सुक नाही अशी माहिती मिळतेय, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर आता खडसेंच्या पुनर्वसनाचं आव्हान असणार आहे.

सध्याच्या घडीला एकनाथ खडसे यांना मंत्रिपद देणं शक्य नसलं तर नियोजन मंडळाचं कार्यकारी अध्यक्ष पद एकनाथ खडसेंना दिलं जाऊ शकतं, या पदाला कॅबिनेट दर्जा आहे. नियोजन मंडळाचं पद देऊन एकनाथ खडसेंना ताकद देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होऊ शकतो. टीव्ही ९ नं अशाप्रकारे दावा केला आहे. एकनाथ खडसे यांचे शिवसेनेसोबत चांगले संबंध नाहीत, त्यामुळे खडसेंसाठी ग्रामीण भागाशी कनेक्ट असलेले कृषी खातं का सोडायचं? असा प्रश्न शिवसेनेत निर्माण झाला आहे.

जर शिवसेनेने कृषी खातं सोडलं नाही तर गृहनिर्माण खाते एकनाथ खडसेंना दिले जाईल असंही सांगितलं जात आहे. परंतु जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खाते सोडण्यास अनुकूल नाहीत. त्यामुळे तुर्तास एकनाथ खडसेंना ताकदीचं पद देण्याबाबत प्रतिक्षा केली जाईल, विरोधी पक्ष भाजपाला रोखण्यासाठी एकनाथ खडसेंचा वापर राष्ट्रवादीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे खुद्द शरद पवार शिवसेनेला खातेबदल करण्यास तयार करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

एकनाथ खडसेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल. एकनाथ खडसेंसोबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. तुर्तास एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे या भाजपातच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे

एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास कसा होता?

१९८० मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, १९८७ मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. १९८९ मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (१९८९ – २०१९) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.

१९९५ ते १९९९ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये खडसेंनी अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारली होती. खडसेंनी नोव्हेंबर २००९ ते ऑक्टोबर २०१४ या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे. (Eknath Khadse Political Career)

२०१४ मध्ये एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते. पण अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल मंत्रालयाची धुरा होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपातून ३ जून २०१६ रोजी एकनाथ खडसेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत लिंबा पाटील यांनी १९८७ मतांनी त्यांचा पराभव केला.

विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी

एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे त्यांनी अनेकदा विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आकडेवारी, पुराव्यांसह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत होते. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना एकनाथ खडसेंनी सलग साडे आठ तास भाषण करून विक्रम नोंदवला. याच भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकनाथ खडसेंचा विशेष सन्मान केला.

 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेShiv SenaशिवसेनाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा