शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

नारायण राणेंनी शपथ घेताच आमच्यासाठी मोठा दिवस म्हणत राणेपुत्रांची पहिली प्रतिक्रिया, शिवसेनेबाबत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 19:13 IST

Narayan Rane News: नारायण राणेंचा शपथविधी झाल्यानंतर त्यांचे पुत्र निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नवी दिल्ली - अनेक बड्या मंत्र्यांचा राजीनामा, काही मंत्र्यांचा खांदेपाटल आणि तब्बल ४३ मंत्र्यांचा शपथविधी यामुळे दिल्लीत सुरू असलेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच महाराष्ट्रामधून माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे शपथ घेत असल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचेही या शपथविधीकडे लक्ष होते. दरम्यान, नारायण राणेंचा (Narayan Rane) शपथविधी झाल्यानंतर त्यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राणे कुटुंबीयांसाठी आजचा दिवस मोठा आणि सुवर्णक्षण आहे, अशी प्रतिक्रिया निलेश आणि नितेश राणे यांनी दिली आहे. तसेच नारायण राणेंवर सोपवलेल्या केंद्रीय मंत्रिपदाच्या जबाबदारीसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत. (This is big day for us, Nilesh and Nitesh Rane reacted as soon as Narayan Rane took oath)

नारायण राणे यांच्या शपथविधीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निलेश राणे म्हणाले की, हा राणे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे, त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. एखादी जबाबदारी सोपवल्यावर नारायण राणे हे ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करतात. ही जबाबदारीही ते उत्तमपणे पार पाडतील.

नारायण राणे यांना अचानक केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही बाळासाहेब ठाकरे यांनी अचानकपणे सोपवली होती. मात्र अजूनही अधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाची आठवण काढतात. आताही तसंच होईल. ते जबाबदारी चोखपणे बजावतील. मंत्रिपद ही जबाबदारी आहे, असे निलेश राणे म्हणाले. यावेळी निलेश राणे  यांना प्रसारमाध्यमांनी शिवसेनेबाबत नाव न घेता विचारले असता ते म्हणाले की, तुम्ही ज्यांना आमचा शत्रू म्हणून सांगत आहात त्यांना आम्ही किंमत देत नाही. नारायण राणेंचा नगरसेवकापासून केंद्रीय मंत्र्यापर्यंतचा प्रवास सोपा नाही आहे. आता जे मिळेल त्यावर आम्ही समाधानी आहोत.

तर नितेश राणे म्हणाले की, नारायण राणेंचा शपथविधी हा राणे कुटुंबीयांसाठी सुवर्णक्षण आहे. तसेच भाजपाचा कार्यकर्ता म्हणूनही हा महत्त्वाचा क्षण आहे. नारायण राणेंची प्रशासनावरील पकड चांगली आहे. तसेच राज्यभरात कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यामुळे भाजपाला पुढील प्रत्येक निवडणूकीत १ नंबरचा पक्ष ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. राणेंच्या मंत्रिपदाचा संघटन म्हणून पक्षाला फायदा होईल. नारायण राणेंबाबत जे काँग्रेसला १२ वर्षांत कळलं नाही. ते भाजपाला कळलं. कार्यकर्त्यांची जाणीव असलेला भाजपा हा पक्ष आहे. त्याचा भाजपाला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असेही नितेश राणे यांनी सांगितले.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Nilesh Raneनिलेश राणे Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण