शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

भूतानमध्ये भारतातूनच इंधन जाते, तिथे आपल्यापेक्षा निम्मीच किंमत; काँग्रेस, स्वामींनी भाजपाला घेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 18:35 IST

Petrol Price hike in India : महिला काँग्रेसने छत्तीसगढचा हवाला देत केवळ काँग्रेसच सामान्य लोकांची काळजी घेऊ शकते. वाढत्या किंमती या देशात आहेत. परंतू काँग्रेसच्या राज्यात त्यापेक्षा 12 रुपयांनी पेट्रोल आणि 4 रुपय़ांनी डिझेल स्वस्त आहे, असे ट्विट केले आहे. 

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींनी सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. सोशल मीडियावर लोकांचा रागही दिसू लागला आहे. आता विरोधकांसह सत्ताधारी भाजपाचे नेते देखील मोदी सरकारला जाब विचारला आहे. राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी शुक्रवारी ट्विट करून सांगितले की, जनतेच्या मते वाढत्या किंमती या त्याचे शोषण करणारी आहे. सरकारने पेट्रोल, डिझेलवरून लेव्ही हटवायला हवा. 

एकच FASTag दोन गाड्यांना वापरता येतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे

स्वामी यांनी ट्विट करून सांगितले की, लोकांचा आवाज कधीतरी स्पष्ट आणि मोठा होतो. कधी कधी असे होते. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींवरून एकसारखा मतप्रवाह आहे. (पॉर्न व्हेंडर, आयफोन चोर आणि फेक आयडीवाले ट्विटर युजर सोडून) इंधनाच्या वाढत्या किंमती शोषण करणाऱ्या आहेत. यामुळे सरकारने कर हटवायला हवेत. 

दुसरीकडे महिला काँग्रेसने छत्तीसगढचा हवाला देत केवळ काँग्रेसच सामान्य लोकांची काळजी घेऊ शकते. वाढत्या किंमती या देशात आहेत. परंतू काँग्रेसच्या राज्यात त्यापेक्षा 12 रुपयांनी पेट्रोल आणि 4 रुपय़ांनी डिझेल स्वस्त आहे, असे ट्विट केले आहे. 

तर युवक काँग्रेसचे नेते श्रीवत्स यांनी भारताचा शेजारी देश भूतानचे उदाहरण दिले आहे. भूतानमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती या भारतापेक्षा निम्म्या आहेत. त्यांना सर्व प्रकारचे इंधन हे भारतातून पुरविले जाते. तिथे पेट्रोलचा दर 50 रुपये आहे, आणि भारतात तोच दर 100 रुपये आहे. भूतानी नागरिक देशविरोधी आहेत का? जे भारतीयांसारखे देशाच्या विकासासाठी भलामोठा कर देऊ इच्छित नाहीत. ही अच्छे दिनची जादू आणि सुंदरता आहे, असा टोला हाणला आहे. 

इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे हे आहेत 5 मोठे गैरसमज; जाणून घ्या MG Moters च्या ZS EV कडून...

सलग 11 व्यांदा वाढ...पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. आता पुन्हा एकदा सलग अकराव्या दिवशी इंधन दरवाढ करण्यात आली आहे. राजस्थानात पेट्रोलचा दर बुधवारी प्रतिलिटर 100 रुपयांपेक्षा अधिक झाला. तर मध्य प्रदेशातही शंभरी पार गेलं आहे. अधिक कर असलेले ब्रँडेड आणि उच्च दर्जाचे पेट्रोल महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांत याआधीच 100 रुपयांच्या वर गेले आहे. नियमित पेट्रोल मात्र प्रथमच शंभरी पार गेले आहे. याच दरम्यान पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर भाजपाच्या एका मंत्र्याने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलBJPभाजपाcongressकाँग्रेसSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी