शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

...अन् मोदींसोबत व्यासपीठावर येण्यास ममतांनी टाळलं; मागील घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 7, 2021 11:59 IST

हल्दियाच्या भूमीवर पाय ठेवल्यनंतर पंतप्रधान मोदी थेट 'मां, माटी, मानुष'पासून ते बंगालच्या संस्कृतीची पानं उलटतील आणि एका मोठ्या जनसभेलासंबोधित करतील. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींची ही पहिलीच जनसभा असेल. या सभेला 2 लाखहून अधिक लोक येणार असल्याचा दावा केला जात आहे. (PM Narendra Modi visit west bengal haldia)

ठळक मुद्देमोदी दुपारी आसामचा दौरा करून थेट हल्दिया येथे येत आहेत.येथे एक सरकारी कार्यक्रम आहे. मात्र त्या कार्यक्रमात मोदींसोबत एका व्यासपीठावर येण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आहे.

कोलकाता -पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा पारा सध्या जबरदस्त वाढला आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना आव्हान दिल्यानंतर, जेपी नड्डा यांना दिल्लीत पोहोचायला अद्याप 24 तासही उलटले नाहीत. तोच बंगालच्या राजकारणात वादळ आणण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येथे येत आहेत. मोदी दुपारी आसामचा दौरा करून थेट हल्दिया येथे येत आहेत. येथे एक सरकारी कार्यक्रम आहे. मात्र त्या कार्यक्रमात मोदींसोबत एका व्यासपीठावर येण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आहे. मोदी नुकतेच 15 दिवसांपूर्वी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त बंगालमध्ये आले होते. (Bengal assembly election 2021)

हल्दियाच्या भूमीवर पाय ठेवल्यनंतर पंतप्रधान मोदी थेट 'मां, माटी, मानुष'पासून ते बंगालच्या संस्कृतीची पानं उलटतील आणि एका मोठ्या जनसभेलासंबोधित करतील. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींची ही पहिलीच जनसभा असेल. या सभेला 2 लाखहून अधिक लोक येणार असल्याचा दावा केला जात आहे.

निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी बंगाल आणि देशाला काही भेटही देणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की "मी हल्दिया, पश्चिम बंगालमध्ये असेल. तेथे बीपीसीएलकडून तयार करण्यात आलेल्या एलपीजी इंपोर्ट टर्मिनलला देशासाठी समर्पित करणार आहे. याशिवाय पंतप्रधान ऊर्जा गंगा प्रोजेक्टअंतर्गत दोभी-दुर्गापूर नॅचरल गॅस पाइपलाइन सेक्शनदेखील देशाला समर्पित करेल." यावेळी मोदी हल्दिया रिफायनरी शिवाय इतर प्रकल्पांचेही उद्घाटन करणार आहेत. निमंत्रण गेले, पण ममता तयार नाहीत -बंगालच्या राजकारणाचा खरा खेळ आता सुरू होतो. हल्दिया येथे पंतप्रधान मोदींचा सरकारी कार्यक्रम आहे. सरकारी प्रोटोकॉलनुसार, या कार्यक्रमात पोहोचण्यासाठी ममतांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी या सरकारी कार्यक्रमादरम्यान उपस्थित राहणार नाहीत, असे त्यांच्या कार्यालयने पीएमओला कळवले आहे. 

ममता पंतप्रधानांसोबत एका व्यासपीठावर का उपस्थित राहू इच्छित नाहीत -नुकतेच 15 दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकात्यात आले होते. या कार्यक्रमात ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या. 23 जानेवारीला व्हिक्टोरिया हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात ममता बोलण्यासाठी उभ्या राहताच तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी 'जय श्रीराम' च्या घोषणा द्यायला सुरुवात केली होती. यावरून ममता प्रचंड संतापल्या होत्या. यावेळी त्यांनी भाषण करण्यास नकार देत, पंतप्रधानांसमोरच रागही व्यक्त केला होता. तसेच, अशा प्रकारे सरकारी कार्यक्रमात बोलावून अपमाण करणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता, पंतप्रधान मोदींसोबत पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येण्याची वेळ आली, तर ममतांनी मोदींसोबत एकाच व्यासपीठावर येण्यास नकार दिला आहे. बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जय श्रीराम ही घोषणा आता एक मुद्दाच बनवला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाtmcठाणे महापालिका