शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Belgaum Eection Result : एकीकरण समितीचे शुभम शेळके पराभूत, पण मतदारांनी दिलं लाखभर मतांचं दान 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 8:17 PM

Belgaum Election Result: अत्यंत चुरशीच्या झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या मंगल अंगडी यांनी कांग्रेसच्या सतीश जरकीहोळी यांचा अवघ्या ५ हजार २४० मतांनी पराभव केला. दरम्यान, या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार यांनीही जोरदार लढत दिली.

बेळगाव - अत्यंत चुरशीच्या झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या मंगल अंगडी यांनी कांग्रेसच्या सतीश जरकीहोळी यांचा अवघ्या ५ हजार २४० मतांनी पराभव केला. दरम्यान, या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार यांनीही जोरदार लढत दिली. भाजपा आणि काँग्रेसमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढाईत शेळके तिसऱ्या स्थानी राहिले. मात्र शेळके यांनाही मतदारांनी भरभरून मदतान करताना तब्बल १ लाख १७ हजार १७४ मतांचे दान त्यांच्या पदरात टाकले. (Maharashtra Ekikaran Samati Shubham Shelke defeated, but voters donated over one lakh 17 thousand votes)

लोकसभा पोटनिवडणूकित महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा उमेदवार शुभम शेळके यांनी १ लाख १७ हजार मते मिळवत नवीन इतिहास रचला.  मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या उत्तर दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघात शुभम शेळके यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. शेळके यांनी भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दक्षिण बेळगाव मध्ये ४४ हजाक ९५० बेळगाव उत्तर मध्ये २४ हजार ५९४ तर बेळगाव ग्रामीण मधून ४५ हजार ५३६ मते मिळवत दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा घाम काढला आहे. 

भाजपा आणि काँग्रेसमध्ये रंगलेल्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकिकरण समितीच्या उमेदवारामुळे रंगत आणली होती. त्यात शिवसेनेने शुभम शेळके यांना पाठिंबा जाहीर केल्याने एकीकरण समितीच्या उमेदवाराचे बळ अधिकच वाढले होते. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनीही शुभम शेळकेंचा प्रचार केला होता. 

टॅग्स :belgaum-pcबेळगावPoliticsराजकारण