शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Belgaum Election Result: बेळगावमध्ये चित्र बदलले, भाजपाला मागे टाकत काँग्रेसने मताधिक्य घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 16:16 IST

Belgaum Election Result 2021 : बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या सुरू असलेल्या मतमोजणीच्या कलांमध्ये आता अखेरच्या टप्प्यात धक्कादायक बदल दिसून येत आहे.

बेळगाव - बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या सुरू असलेल्या मतमोजणीच्या कलांमध्ये आता अखेरच्या टप्प्यात धक्कादायक बदल दिसून येत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या भाजपाच्या उमेदवार मंगल अंगडी या आता पिछाडीवर पडल्या आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार सतीश जरकीहोळी यांनी जोरदार मुसंडी मारत १० हजारांची आघाडी घेतली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनाही भरभरून मतदान झाले असून, शेळके यांनी आतापर्यंत ९४ हजार ७२७ मते मिळवली आहेत.  काँग्रेसने सतीश जरकीहोळींसारखा तगडा उमेदवार दिल्याने आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेकळेंच्या माध्यमातून आव्हान दिल्याने बेळगावमधील लोकसभेची पोटनिवडणूक चुरशीची झाली होती. मात्र सहानुभूतीच्या लाटेमुळे सुरुवातीच्या कलांमध्ये मंगल अंगडी यांनी आघाडी घेतली होती. मात्र मतमोजणी पुढे सरकत गेल्यावर काँग्रेसचे उमेदवार सतीश जरकीहोळी यांनी पिछाडी भरून काढली. आताच्या क्षणाला सतीश जरकीहोळी हे ३ लाख ५५ हजार ८८९ मतांसह आघाडीवर आहेत. तर भाजपाच्या मंगल अंगडी या ३ लाख ४५ हजार ७४९ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर शुभम शेळके ९४ हजार ७२७ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

भाजपाचे नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाल्याने बेळगाव लोकसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. त्यानंतर या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. 

टॅग्स :belgaum-pcबेळगावKarnatakकर्नाटकPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा