शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Belgaum Election Result: शिवसेनेच्या आव्हानानंतरही बेळगावात भाजपाची मुसंडी, मंगल अंगडी आघाडीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 12:19 IST

Belgaum Election Result 2021: काँग्रेसने सतीश जरकीहोळींसारखा तगडा उमेदवार दिल्याने आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेकळेंच्या माध्यमातून आव्हान दिल्याने बेळगावमधील लोकसभेची पोटनिवडणूक चुरशीची झाली होती.

बेळगाव - काँग्रेसने सतीश जरकीहोळींसारखा तगडा उमेदवार दिल्याने आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेकळेंच्या माध्यमातून आव्हान दिल्याने बेळगावमधील लोकसभेची पोटनिवडणूक चुरशीची झाली होती. मात्र मतमोजणीला चार तास उलटत असताना समोर येत असलेल्या कलांमुळे या निवडणुकीत आता भाजपा हळुहळू मुसंडी मारताना दिसत आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपाच्या मंगल अंगडी यांनी आघाडी घेतली आहे. तर शिवसेनेने पाठिंबा दिलेले महाराष्ट्र एकीकरण समितीची उमेदवार शुभम शेळके हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. (Belgaum Election Result 2021)

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सध्या समोर आलेल्या कलांमध्ये भाजपाच्या मंगल अंगडी यांना १ लाख ७६ हजार ५१२ मते मिळाली आहे. तर काँग्रेसचे सतीश जरकीहोळी हे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना १ लाख ६७ हजार ५४ मते मिळाली आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना ४५ हजार ७२१  मते मिळाली आहेत. 

भाजपाचे नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाल्याने बेळगाव लोकसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. त्यानंतर या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. दरम्यान, कर्नाटकमधील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्येही भाजपाने आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपा उमेदवार शरणू सलगर यांना १५ हजार ५२ मते मिळाली आहेत. तर काँग्रेस उमेदवार माला बी. नारायणराव यांना ७९०० मते मिळाली आहेत. तर जनता दल सेक्युलरचे उमेदवार सय्यद यासरूब अली काद्री यांना ११५८ मते मिळाली आहेत. 

टॅग्स :belgaum-pcबेळगावBJPभाजपाcongressकाँग्रेस