शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लढाई गांधी-गोडसे यांच्यातील, सिद्धूंचा मोदींवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 04:44 IST

लोकसभा निवडणुका म्हणजे कृष्ण आणि कंस, राम आणि रावण यांच्यातील तसेच गांधी व गोडसे यांच्यातील युद्ध आहे, असे काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू सभेत म्हणाले.

अहमदाबाद : लोकसभा निवडणुका म्हणजे कृष्ण आणि कंस, राम आणि रावण यांच्यातील तसेच गांधी व गोडसे यांच्यातील युद्ध आहे, असे काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू सभेत म्हणाले. राफेल सौदा, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या यावरून सिद्धू यांनी मोदी यांच्यावर घणाघाती हल्ला चढविला. ते म्हणाले की, चीन समुद्राखाली रेल्वे सुरू करत आहे पण भारतात मोदी मात्र चौकीदार तयार करत आहेत. तत्पूर्वी काँग्रेस नेते आणि पंजाबमधील मंत्री नवजोत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना त्यांच्या होमपीचमध्ये टीकेचं लक्ष्य केलं होतं.

गुजरातमधील अहमदाबाद येथे नवजोत सिंग सिद्धू यांनी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली होती. त्यामध्ये नवजोत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधानांवर टीका करताना म्हणाले आहे की होती, मोदी सांगतात मी फकीर आहे, मी स्वयंसेवक आहे, मी चौकीदार आहे पण तुम्ही हे का सांगत नाही मी पंतप्रधान आहे. मी ठामपणे सांगतो मोदी चोर आहेत अशी घणाघाती टीका नवजोत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्यावर केली. अहमदाबादमधील धोलका येथील जाहीर सभेत ते बोलत होते. 

२०१४ साली नरेंद्र मोदी देशाला जगात सर्वश्रेष्ठ बनविण्याच्या नावाखाली सत्तेवर आले मात्र आज ते सर्वांना चौकीदार बनवत आहेत. लोकशाही आज गुंडशाही झाली आहे. जे मोदींची भक्ती करतील ते देशभक्त आणि त्यांचा विरोध करतील ते देशद्रोही ठरतात. आम्हाला पंतप्रधान आणि भाजपाच्या समर्थकांकडून देशभक्तीचं प्रमाणपत्र नको असा टोलाही नवजोत सिंग सिद्धू यांनी लगावला. इथे लोकांच्या एकवेळ जेवण मिळत नाही. उपाशी पोटी तुम्ही लोकांना योगा करायला सांगता? सर्वांना बाबा रामदेव बनवायचा आहे का? लोकांचे खिसे रिकामे अन् खाते उघडले जात आहेत असा चिमटा नवजोत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या खास शैलीत काढला.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019