'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 18:26 IST2024-10-26T18:24:23+5:302024-10-26T18:26:08+5:30
RSS on Batenge To Katenge: लोकसभा निवडणुकीनंतर भाजपकडून 'बटेंगे तो कटेंगे' असा नारा देत प्रचार केला जात आहे. त्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय आहे, याबद्दल आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी भाष्य केले.

'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
Batenge To Katenge RSS: हरियाणा विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा आणि उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत ही घोषणा भाजपच्या नेत्यांकडून दिली जाताना दिसत आहे. या घोषणेबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी कारण सांगत या घोषणेचे समर्थन केले.
दत्तात्रेय होसबळे म्हणाले, "स्फूर्ती हीच आहे की, समाजाची एकता, एकामत्मा. आपण जाती, भाषा, प्रांतावरून भेद केला, तर आपण विभागले जाऊ. त्यामुळे एकता आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी की, आपण हे कायम ठेवलं तर समाजात केवळ उपदेश असता, तर झालं असतं. प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी हे कृतीत आणावं लागेल", असे भाष्य त्यांनी केले.
इतर क्षेत्रातील लोक हे समजत आहेत, ही चांगली गोष्ट -दत्तात्रेय होसबळे
"आज खूप सारे धार्मिक आणि इतर क्षेत्रातील लोक हे अनुभवातून समजत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्याचं स्वागत करत आहेत. हिंदू समाजाची एकता हे संघाचे जीवन व्रत आहे. आम्ही आग्रहाने सांगू आणि कृतीही करू", असे दत्तात्रेय होसबळे प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
"हिंदू एकता लोक कल्याणासाठी आहे. हिंदू सगळ्यांना सुख प्रदान करेल. जगातील कोणत्याही देशातील संकटात. त्यासाठी हिंदू एकता आवश्यक आहे. स्वतःला जगवणं आणि जगाचं भलं करणं, यासाठी आम्हाला हिंदू एकता हवी आहे, यात कोणतेही दूमत नाही", असे त्यांनी सांगितले.
हिंदूंना तोडण्यासाठी अनेक शक्ती काम करत आहेत -होसबळे
"हिंदूमध्ये फूट पाडण्यासाठी शक्ती काम करत आहेत. त्याबद्दल सावध करावं लागतं. त्याबद्दल सावधगिरी बाळगावी लागते. त्या अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. त्या हिंदूंना जातीच्या नावावर, विचारधारांच्या नावावर तोंडत आहेत. त्यामुळे आम्हाला सावध राहावं लागतं", अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी मांडली.