शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

अटीतटीच्या लढतीत उर्वरित उमेदवारांचे खाते मात्र बुडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 1:07 AM

लोकसभा निवडणुका असोत, विधानसभा निवडणुका असोत वा महापालिका निवडणुका असतो;

मुंबई : लोकसभा निवडणुका असोत, विधानसभा निवडणुका असोत वा महापालिका निवडणुका असतो; या निवडणुकांमध्ये विजयाची खात्री नसली, तरीदेखील बहुतांशी उमेदवार हे विविध राजकीय पक्षांसह अपक्ष म्हणून निवडणूक लढवितात. मात्र, अशा निवडणुकांमध्ये डिपॉझिट जप्त होऊ नये, म्हणून आवश्यक मते प्राप्त होत नसल्याने अनेक उमेदवारांची दांडी तर गुल होतेच; शिवाय डिपॉझिटही जप्त होते. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील सहा निवडणुकांचा इतिहास पाहिला, तर येथेही प्रामुख्याने दोन उमेदवारांमध्ये लढत झाली असून, उर्वरित म्हणजे ८० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून यावेळी काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर आणि भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांची प्रामुख्याने लढत आहे. उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील एकूण उमेदवारांची संख्या १८ असून, काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने चुरस आहे. उर्वरित उमेदवार विविध राजकीय पक्षांचे असून, काही अपक्ष आहेत. यापैकी किती जणांना यावेळी आपले डिपॉझिट वाचविण्यात यश येते, हे पाहणेदेखील तेवढेच औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, अपक्ष फॅक्टर जेवढा महत्त्वाचा ठरतो; तेवढाच आता मनसे फॅक्टरही महत्त्वाचा ठरू लागल्याचे चित्र सध्या तरी आहे.>डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही, तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019