शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

‘दीदी बोले- खेला होबे, BJP बोले- विकास होबे’; पंतप्रधानांचा ममता बॅनर्जींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 1:10 PM

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांना उरले अवघे काही दिवस, तृणमूल आणि भाजपमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत.

ठळक मुद्देपश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांना उरले अवघे काही दिवसतृणमूल आणि भाजपमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये अनेक दिग्गज नेते रॅलीमध्ये सहभागी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरु आहेत. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरूलिया येथे रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार निशाणा साधला. दीदी बोले- खेला होबे, BJP बोले- विकास होबे’, असं म्हणत पंतप्रधानांनी ममता बॅनर्जींना टोला लगावला. यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन असल्याचं म्हणत निशाणा साधला."पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारचे अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. ममता बॅनर्जी यांना हे माहित आहे म्हणून त्या 'खेला होबे' असं म्हणत आहेत. जर तुम्हाचं ध्येय सेवा करणं असेल तर खेळलं जात नाही. आता खेळ संपणार आणि विकास सुरू होणार," असं मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पुरुलिया येथील भाषणाची सुरूवाती बंगाली भाषेतूनच केली. "पुरुलियाचं प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्याशी जुनं नातं आहे. आज पुरुलियामध्ये पाण्याचा संघर्ष ही मोठी समस्या आहे. या ठिकाणी पाणी नसल्यानं शेती, पशूपालन करण्यास ससम्या निर्माण होत आहेत. तर पिण्याच्या पाण्याच्या समस्याही वाढत आहेत. या ठिकाणच्या लोकांना स्वत:च्या भरवशावर सोडून तृणमूल काँग्रेस आपला खेळ खेळण्यात व्यस्त आहे. त्यांनी पुरुलियाच्या लोकांना भेदभाव करणारं प्रशासन दिलं आणि सर्वात मागासलेलं क्षेत्रही बनवलं," असंही ते म्हणाले. पुरुलिया क्षेत्राची कनेक्टिव्हीटी सुधारण्याची आवश्यकता आहे. बंगालच्या प्रत्येक क्षेत्राला रेल्वे मार्गानं जोडण्याला आमचं प्राधान्य आहे. २ मे नंतर जेव्हा भाजपचं सरकार सत्तेत येईल त्यानंतर रेल्वेच्या प्रकल्पांना गती येईल. पुरुलिया आणि आसपासच्या ठिकाणी अशी व्यवस्था केली जाईल की या ठिकाणाहून लोकांना दुसरीकडे जावं लागणार नाही. बंगालसाठी केंद्र सरकारनं ५० हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं. दीदी भारताच्या कन्या"आमच्यासाठी दीदी या भारताच्या कन्या आहेत. जेव्हा त्यांना दुखापत झाली तेव्हा आम्हालाही चिंता झाली. त्यांच्या पायाची दुखापत लवकरच बरी होवो," असंही मोदी यावेळी म्हणाले. केंद्र सरकरानं जेव्हा या ठिकाणी स्वस्त दरातील तांदूळ पाठवले तेव्हा टीएमसीच्या काही लोकांनी त्यातही घोटाळा केला. भरती परीक्षांमध्येही टीएमसीनं जे काही केलंय तेदेखील नीट केलं जाणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपा