शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election Results 2021: अंदाज अपना अपना! फक्त दोन राज्यात सत्ताबदल; संजय राऊतांचा एक्झिट पोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 10:14 IST

Assembly Election Results 2021: पश्चिम बंगाल, आसाम, केरळमध्ये सत्ताबदल होणार नाही; संजय राऊत यांचा अंदाज

मुंबई: पाच राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम, पुद्दुचेरीत कोणाची सत्ता येणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या सुरुवातीचे कल हाती येत असून पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. तर आसाममध्ये भारतीय जनता पक्ष सत्ता राखेल अशी शक्यता आहे. केरळमध्येही सत्ताधारी डाव्यांनी मुसंडी मारली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना निकालाबद्दल त्यांचा अंदाज सांगितला आहे.काँग्रेसची पिछेहाट, डावे सुस्साट, सुरुवातीच्या कलांमध्ये बहुमत; केरळमध्ये इतिहास घडणार?तमिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता कुठेही सत्ताबदल होणार नाही, असं भाकीत संजय राऊत यांनी वर्तवलं. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना पराभूत करण्यासाठी भारतानं जंगजंग पछाडलं. पण बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही. भाजपच्या जागा वाढणार आहेत. त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. देशात कोरोनाचं संकट असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री बंगालमध्ये तळ ठोकून होते. याबद्दल त्यांचं कौतुकच करायला हवं, असा खोचक टोला त्यांनी लगावला.पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्ता राखतील. भाजपच्या जागा वाढणार असल्यानं त्याचा फटका तृणमूलला बसेल. गेल्या वेळेच्या तुलनेत त्यांच्या जागा कमी होतील. पण काठावरचं का होईना, त्यांना बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केरळमध्ये डावे, तर आसाममध्ये भाजप सत्ता राखेल. पण तमिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये सत्ताबदल होईल, असा अंदाज राऊत यांनी वर्तवला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021BJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस